मुंबई - Anushka Sharma and Virat Kohli : अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय क्रिकेटर विराट कोहली आपल्या मुलांच्या गोपनीयतेबाबत खूप लक्ष देतात. अलीकडेच या जोडप्यानं त्यांच्या दुसऱ्या मुलाचे स्वागत केलं. या दोघांनी आपल्या मुलाचं नाव अकाय ठेवलं आहे. गरोदरपणात या जोडप्यानं मीडिया आणि पापाराझीला गोपनीयता ठेवण्याचे आवाहन केलं होतं. मीडिया आणि पापाराझीच्या या विशेष सहकार्यासाठी या जोडप्यानं धन्यवाद मानणाऱ्या चिठ्ठीसह एक मोठे गिफ्ट पॅकेट पाठवले आहे. आता याची झलक सोशल मीडियावर शेअर करण्यात आली आहे. एका पापाराझीनं त्याच्या अधिकृत इंस्टाग्रामवर अनुष्का आणि विराट यांच्याकडून मिळालेल्या धन्यवाद गिफ्टची झलक दाखवली आहे.
अनुष्का आणि विराटानं पापाराझीचं मानलं आभार :अनुष्का आणि विराटनं दिलेल्या गिफ्टमध्ये बऱ्याच आयटमसह एक धन्यवाद नोट देखील दिसत आहे. क्लिपची सुरुवात आभारानं होते. या चिठ्ठीत लिहिले आहे, "आमच्या मुलांच्या गोपनीयतेचा आदर केल्याबद्दल आणि नेहमी सहकार्य राखल्याबद्दल धन्यवाद. लव्ह अनुष्का आणि विराट." या गिफ्टमध्ये एका बॅगसह काही गॅझेट्स आणि एक बाटली आहे. या भेटवस्तूबद्दल पापाराझीनं या जोडप्याचं आभार मानलं आहेत. दरम्यान अकायचा जन्म हा लंडनमध्ये झाला होता. यानंतर अनुष्का बरेच दिवस लंडनमध्येच थांबली होती. अकायच्या जन्माची बातमी अनुष्का आणि विराटनं सोशल मीडियाद्वारे दिली होती.