महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

अनुराग कश्यप, गुलशन देवय्या स्टारर 'बॅड कॉप'चा ट्रेलर रिलीज - Bad Cop trailer - BAD COP TRAILER

Bad Cop trailer released : खतरनाक खलनायकाच्या भूमिकेतील अनराग कश्यप आणि दुहेरी भूमिकेत प्रेक्षकांना चकित करण्यासाठी सज्ज झालेल्या गुलशन देवय्या यांच्या 'बॅड कॉप' मालिकेचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. ही थरारक मालिका 21 जून पासून ओटीटीवर प्रसारित होत आहे.

'Bad Cop' trailer released
'बॅड कॉप'चा ट्रेलर रिलीज (ANI/ Instagram)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 7, 2024, 4:02 PM IST

मुंबई - Bad Cop trailer released : अनुराग कश्यप आणि गुलशन देवैया यांच्या भूमिका असलेल्या 'बॅड कॉप' या थरारक मालिकेचा ट्रेलर लॉन्च करण्यात आला आहे. हरलीन सेठी, सौरभ सचदेवा आणि ऐश्वर्या सुष्मिता हे देखील या मालिकेत आहेत.

या मालिकेमध्ये गुलशन देवय्या करण आणि अर्जुन या जुळ्यांच्या दुहेरी भूमिकेत दिसणार आहे. या दोन्ही भूमिका परस्पर विरोधी स्वभावाच्या व्यक्तींच्या आहेत. यामध्ये करण हा एक पॉवर-पॅक्ड पोलिस आहे आणि अर्जुन एक विचित्र चोर आहे. दोघेही आपल्या भाग्याच्या शोधात आहेत. अनपेक्षितपणे, त्यांच्या जीवनाचा मार्ग बदलून जातो. यामध्ये अनुराग कश्यपनं एक डॅशिंग भूमिका साकारली आहे. हरलीन सेठी देविकाची भूमिका साकारत आहे तर या थ्रिलरमध्ये सौरभ सचदेवा आणि ऐश्वर्या सुष्मिता महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत.

या मालिकेबद्दल बोलताना दिग्दर्शक आदित्य दत्त म्हणाला, "बॅड कॉप ही तुमच्या मूळ कल्ट मसाला कथांप्रमाणेच एक रंजक कथानक आहे. यामध्ये कजबे मामा नामक ( अनुराग कश्यप ) एक प्राणघातक खलनायक आणि दुहेरी भूमिकेत असलेला तुमचा नायक आहे. मी नेहमीच दुहेरी ड्रामांसाठीचा उत्सुक प्रेक्षक आहे, त्यामुळे जेव्हा मी बॅड कॉपवर रेन्सिल, आराधना आणि फ्रेमंटल इंडियाच्या टीमबरोबर काम करत होतो, तेव्हा आम्हाला माहित होते की हा घटक आमचा हुक असेल. आम्ही सुरुवातीपासून अ‍ॅक्शन आणि चेस सीक्वेन्स डिझाइन केले आहेत. प्रेक्षकांना एक मोठा अनुभव असण्याची आशा मला वाटते. अनुराग, गुलशन, हरलीन आणि सौरभ सारखे कलाकार असल्यामुळे कथानक वास्तववादी बनण्यासाठी मदत झाली. मला वाटतं त्यांनाही या कामाचा आनंद मिळाला असेल."

तो साकारत असलेल्या कजबे मामा या व्यक्तिरेखेबद्दल बोलताना अनुराग कश्यप म्हणाला, "कजबे मामा हा एक प्रकारचा खलनायक आहे. त्याचं वागणं एकाच वेळी करिष्माई आणि प्राणघातक आहे. यातील सीन्स शूट करताना मी घाबरलो होतो आणि साशंकही होतो. कजबे हा खूप शक्तिशाली आहे आणि मी या भूमिकेसाठी तयार केलेल्या अनेक नकारात्मक पात्रांमधून मला शोधलं आहे आणि या शोने माझी एक वेगळी बाजू समोर आणली आहे ."

तो पुढे म्हणाला, "माझ्याकडे कजबेसाठी कोणतीही प्रक्रिया नव्हती, खरेतर या भूमिकेसाठी मला परिंदा मधील नाना पाटेकर आणि हसीलमधील इरफान खान यांच्याकडून प्रेरणा मिळाली. मी ते शूट करण्यापूर्वीच स्क्रिप्ट घेतो आणि संवाद लेखक मला त्या भूमिकेकडं कसं जायचं यासाठी मदत करतात. मी एक नकारात्मक व्यक्तिरेखा साकारणार आहे. मला आशा आहे की या अवतारात प्रेक्षक माझा आनंद घेतील." 'बॅड कॉप' 21 जूनपासून डिस्ने हॉटस्टारवर प्रवाहित होईल.

हेही वाचा -

  1. नितीश कुमार, चंद्राबाबू नायडू आज तुमचे उद्या आमचे; संजय राऊतांचा मोठा दावा, 'कंगनाला मारणं चुकीचं' - Sanjay Raut On Kangana Beaten Case
  2. जातीय तणाव टाळण्यासाठी कर्नाटकात 'हमारे बारह' चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी - Hamare Barah
  3. निवडणूक जिंकल्यानंतर पवन कल्याणचं कुटुंबीयांकडून जंगी स्वागत, चिरंजीवीच्या पायावर झाला नतमस्तक - Pawan Kalyan

ABOUT THE AUTHOR

...view details