मुंबई - Sandeep Reddy Vanga Vs kiran Rao : अभिनेता रणबीर कपूर, अभिनेत्री रश्मिका मंदान्ना स्टारर ॲक्शन चित्रपट 'ॲनिमल' बॉक्स ऑफिसवर सुपर हिट झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांनी प्रचंड पसंत केलं. 1 डिसेंबर 2023 रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन साऊथ चित्रपट दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा यांनी केलं होतं. या चित्रपटात महिलांची प्रतिमा ज्या प्रकारे दाखवण्यात आली आहे, त्यामुळे फक्त महिलाच नव्हे तर समाजही दुखावला गेला आहे. अनेक महिला आता देखील 'ॲनिमल'च्या डायरेक्टरला सोशल मीडियावर ट्रोल करत आहेत. संदीपने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत काही गोष्टींवर भाष्य केले.
किरण राव यांनी केली संदीप रेड्डी वंगावर टिप्पणी :आमिर खानची पूर्वाश्रमीची पत्नी दिग्दर्शिका किरण रावही संदीप यांनी केलेल्या वक्तव्यामुळे संतप्त झाली. यानंतर 'ॲनिमल'च्या टीमनं किरण राव यांच्या वक्तव्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. किरण राव अनेकदा महिलांच्या मुद्दावर बोलताना दिसते. किरणला दिग्दर्शक संदीप यांनी केलेल्या विधानामुळे राग आला आहे. किरणनं स्पष्टपणे सांगितले की, ''तिचा आमिरच्या चित्रपटांशी काहीही संबंध नाही.'' किरण पुढं म्हटलं की, ''आमिर खान एक सज्जन माणूस आहे, काही चित्रपट आणि गाण्यांबद्दल त्यानं देखील माफी मागितली आहे, ज्यात महिला विरोधी काही गोष्टी होत्या. मी अनेकदा महिलांच्या बाजूने बोलते, पण वंगा यांना असे का वाटते की मी त्याच्या चित्रपटाला टारगेट केलंय. त्यांना काही अडचण असेल तर त्यांनी मिस्टर खान यांच्याशी बोलावे.''