महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

अनिल कपूरनं ॲक्शन ड्रामा 'सुभेदार'मधील शेअर केला फोटो - ANIL KAPOOR - ANIL KAPOOR

Anil Kapoor : अनिल कपूर आता 'सुभेदार'मुळे चर्चेत आला आहे. या चित्रपटामधील एक फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Anil Kapoor
अनिल कपूर (अनिल कपूर (IMAGE- IANS))

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 17, 2024, 2:54 PM IST

मुंबई - Anil Kapoor :बॉलिवूडचा 'झक्कास' अभिनेता अनिल कपूर सध्या सलमान खानच्या सर्वात लोकप्रिय रिॲलिटी शो 'बिग बॉस ओटीटी 3'चं सूत्रसंचालन करणार आहे. सलमानच्या खान व्यग्र शेड्यूल असल्यामुळं 'बिग बॉस ओटीटी 3'ची होस्टिंगची ऑफर अनिल कपूरला देण्यात आली होती. आता तो 17 जून रोजी ओटीटी प्लेटफॉर्मवर दिसणार आहे. दरम्यान, अनिल कपूरनं त्याचा पुढचा चित्रपट 'सुभेदार'च्या शूटिंगला सुरुवात केली आहे. आता या चित्रपटामधील एक फोटो समोर आला आहे. या फोटोमध्ये अनिल कपूर एका व्यक्तीचा गळा दाबताना दिसत आहे. याशिवाय अनिल कपूरच्या चेहऱ्यावर सुभेदार असण्याचा अभिमान देखील दिसत आहे.

सेटवरील अनिल कपूरचा फोटो आला समोर :अनिल कपूरनं आज 17 जून रोजी त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर फोटो शेअर करत लिहिलं, "आतापर्यत हात कुठे उचलला आहे, ही फक्त तयारी आहे." अनिल कपूरच्या ॲक्शन ड्रामा चित्रपट 'सुभेदार'ची घोषणा 2024 रोजी करण्यात आली होती. यानंतर ॲमेझॉन प्राईमनं एक सुंदर पोस्टर रिलीज केलं होत. या पोस्टरमध्ये अनिल कपूर सुभेदारच्या भूमिकेत हातात बंदूक घेऊन उभा असल्याचा दिसत होता. सुरेश त्रिवेणी या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत. अनिल कपूर त्याच्या ॲक्शन ड्रामा चित्रपटासाठी खूप उत्सुक आहे. सुभेदारची निर्मिती अबंडंटिया एंटरटेनमेंट, ओपनिंग इमेज, अनिल कपूर फिल्म्स आणि कम्युनिकेशन नेटवर्क यांनी संयुक्तपणे केली आहे.

अनिल कपूर 'हा' चित्रपट चर्चेत :'सुभेदार' चित्रपटामध्ये अनिल कपूरचा अनोखा अंदाज चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. त्याच्या आगामी चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर तो पुढं 'वेलकम टू द जंगल' चित्रपटामध्ये दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्याबरोबर अक्षय कुमार, दिशा पटानी, रवीना टंडन, जॅकलिन फर्नांडिस, राजपाल यादव, सुनील शेट्टी, परेश रावल, जॉनी लिव्हर, कृष्णा अभिषेक, किकू शारदा, अर्शद वारसी, दलेर मेहंदी, मिका सिंग, लारा दत्ता, मुकेश तिवारी, शारीब हाशिम, तुषार कपूर, श्रेयस तळपदे, राहुल देव, झाकीर हुसेन, यशपाल शर्मा यांच्यासह अनेक स्टार्स खळबळ माजवणार आहेत. या चित्रपटाची सध्या शूटिंग सुरू आहे. याशिवाय तो 'तख्त' या चित्रपटात देखील दिसणार आहे.

हेही वाचा :

  1. कन्नड फिल्म इंडस्ट्रीवरील कलंक पुसला जावा आणि रेणुकास्वामीच्या पत्नीला न्याय मिळावा, किच्चा सुदीपची मागणी - Darshan Arrest in Murder Case
  2. प्रियांका चोप्रा ते सनी देओलपर्यंत या सेलेब्रिटींनी चाहत्यांना दिल्या ईदच्या शुभेच्छा - priyanka chopra
  3. छोट्या मुलांसाठी आलिया भट्टनं 'पिक्चर बुक' केलं लॉन्च - Alia Bhatt

ABOUT THE AUTHOR

...view details