महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

बिग बॉसच्या घरात अनिल कपूरला पाहायचे आहेत 'हे' बॉलिवूडचे कलाकार! - Anil Kapoor host Big Boss OTT - ANIL KAPOOR HOST BIG BOSS OTT

Anil Kapoor host Big Boss OTT : अनिल कपूर यंदाच्या बिग बॉस ओटीटी शोचं होस्टिंग करत आहे. या शोमध्ये कोणत्या बॉलिवूड कलाकारांना पाहायला आवडेल असं विचारलं असता त्यानं अनेक दिग्गज कलाकारांसह स्वतःचंही नाव घेतलं आहे.

Bigg Boss OTT show
बिग बॉस ओटीटी (Bigg Boss OTT PR team)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 19, 2024, 10:59 AM IST

मुंबई - Anil Kapoor host Big Boss OTT : बिग बॉस हा खेळवजा रियालिटी शो गेली दोन दशकं भारतीय प्रेक्षकांचं मनोरंजन करत आला आहे. तसं बघायला गेलं तर बिग बॉस हा शो जागतिक स्तरावर प्रसिद्धी मिळविलेला कार्यक्रम असून भारतातही तो हिंदी बरोबरच अनेक प्रादेशिक भाषांमध्ये, उदा. तामिळ, तेलगू मल्याळम, कन्नड, बंगाली, मराठी इत्यादी भाषामध्ये प्रदर्शित केला जातो. दोनेक वर्षांपूर्वी बिग बॉसच्या हिंदी शोचा बिग बॉस ओटीटी हा प्रकार सुरु करण्यात आला आणि त्यालाही प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला. आता त्याचं तिसरं वर्ष असून येत्या २० जूनला त्याचं प्रसारण सुरु होणार आहे. यावर्षी या शो ची टॅग लाईन आहे, 'अब सब बदलेगा'.

बिग बॉस ओटीटी (Bigg Boss OTT PR team)



बिग बॉसच्या शोचा महत्वाचा घटक म्हणजे त्याचा होस्ट. मुख्य बिग बॉसच्या होस्टचं काम सलमान खान गेली १६ -१७ वर्षे उत्कृष्टपणे करतोय. बिग बॉस ओटीटीच्या पहिल्या पर्वाचा होस्ट होता करण जोहर, तर दुसऱ्या वर्षी सलमान खान. यावर्षी बिग बॉस ओटीटी ३ चा होस्ट असणार आहे अनिल कपूर. या नवीन कामासाठी अनिल कपूर उत्सुक असून सलमान बरोबर होणाऱ्या तुलनेसाठीही तो तयार आहे. 'बिग बॉस च्या होस्टिंगमध्ये सलमान खानची जागा कोणी घेऊ शकणार नाही. तो इर्रेप्लेसेबल आहे. त्याचप्रमाणे अनिल कपूर सुद्धा इर्रेप्लेसेबल आहे', असं अनिल कपूर या शोच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये ठाम आत्मविश्वासानं म्हणाला.



जेव्हा अनिल कपूरला विचारण्यात आले की बॉग बॉसमध्ये तो कोणत्या बॉलिवूड कलाकारांना बघतो, तेव्हा तो उत्तराला "मी आता ३० वर्षांचा असतो तर नक्की भाग घेतला असता. परंतु, मला मोकळीक दिली तर मला सलमान खान, करण जोहर, कपिल शर्मा आणि स्वतः मला बिग बॉसमध्ये बघायला आवडेल आणि त्या वेळी होस्ट असतील अमिताभ बच्चन." मराठी बिग बॉस बद्दल अनिल कपूर म्हणाला की, "मराठीत रितेश देशमुख उत्तम काम करतोय. हिंदीत सलमान खान आहे. दोघेही माझे कनिष्ठ बंधू आहेत. आता मीही आलोय. आम्ही एकमेकांचे वेल विशर्स आहोत."

ABOUT THE AUTHOR

...view details