मुंबई - kalki 2898 ad : 'कल्की 2898 एडी' रिलीज होण्यासाठी फक्त दोन दिवस उरले आहेत. प्रभासचे चाहते या चित्रपटाची आतुरतेनं वाट पाहत आहेत. 'कल्की 2898 एडी'नं ॲडव्हान्स बुकिंगमध्ये आतापर्यंत 5 लाखांहून अधिक तिकिटे विकली आहेत. 'कल्की 2898 एडी' चित्रपटाच्या तिकिट दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे आणि आता आंध्र प्रदेश सरकारनं यासाठी सहमती दिली आहे. 600 कोटींच्या बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट देशातच नाही तर परदेशातही चर्चेत आहे. उत्तर अमेरिकेत चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग सुरू आहे. चित्रपटाची प्रसिद्धी लक्षात घेऊन आंध्र प्रदेश सरकारनं प्रभास स्टारर चित्रपटाच्या तिकिट दरात वाढ करण्यास परवानगी दिल्यानंतर याबद्दल चर्चा आता सोशल मीडियावर होत आहेत.
'कल्की 2898 एडी' तिकिटमध्ये वाढ : आंध्र प्रदेश सरकारनं सिंगल स्क्रीन थिएटरमध्ये प्रति तिकिट 75 रुपये आणि मल्टिप्लेक्समध्ये 175 रुपयांनी वाढवण्याची परवानगी दिली आहे. या सुपर हाय बजेट चित्रपटासाठी राज्य सरकारनं ही वाढ दोन आठवड्यांसाठी दिली आहे. आंध्र सरकारनं 'कल्की 2898 एडी'च्या निर्माते अश्विनी दत्त यांना त्याचं पालन करण्याची विनंती केली आहे.' या निर्णयामागील कारण म्हणजे चित्रपटाची कमाई वाढवणे आहे. 'कल्की 2898 एडी' चित्रपटात अमिताभ बच्चन, प्रभास, दीपिका पदुकोण, कमल हसन, दिशा पटानी हे स्टार्स मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट 27 जूनला रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होत आहे.