मुंबई - Anant Ambani :देशातील अब्जाधीश दाम्पत्य मुकेश आणि नीता अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी त्याची बालपणीची मैत्रीण राधिका मर्चंटबरोबर लग्न करणार आहे. अंबानी कुटुंबानेही या लग्नाची आमंत्रणे देण्यास सुरुवात केली आहे. बॉलीवुडमधील काही मोठ्या व्यक्तींना वैयक्तिकरित्या आमंत्रित केल्यानंतर, आता अनंत अंबानी गेल्या रविवारी कृष्णा काली मंदिरात पोहोचला. त्याच्यबरोबर शिखर पहाडिया आणि वीर पहाडिया देखील यावेळी स्पॉट झाले. गेल्या रविवारी संध्याकाळी उशिरा अंबानी कुटुंबाचा धाकटा मुलगा अनंत आणि मित्रांसह महाराष्ट्रातील कृष्णा काली माता मंदिरात गेल्यानंतर चर्चेत आला.
अनंत अंबानी स्पॉट झाला कृष्ण काली मंदिरात : या मंदिरातून अनंतचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आले आहेत. एका व्हिडिओमध्ये तो काली मंदिरात हवन आणि पूजा करताना दिसत आहे. जान्हवी कपूरचा कथित बॉयफ्रेंड शिखर पहाडिया आणि त्याचा अभिनेता-भाऊ वीर पहाडियाही देखील व्हिडिओमध्ये पुजा करताना दिसत आहेत. एका व्हिडिओमध्ये अनंत काली पूजा करत आहे. पूजा केल्यानंतर अनंतची माध्यम प्रतिनिधींशी भेट झाली. यावेळी त्याच्याबरोबर भरत मेहरादेखील उपस्थित होते. कृष्ण काली मंदिरातची स्थापना त्यांनीच केली आहे. अनंत अंबानी नेरळ येथील कृष्ण काली मंदिरात असल्याचं सांगत उपस्थित असलेल्या माध्यमांचेही आभार मानले. अनंत राधिकाशी लग्न करण्यापूर्वी तो देव-देवतांना आमंत्रण देण्यासाठी अनेक ठिकाणी जाताना दिसत आहे.