मुंबई Sangeet Ceremony : अभिनेता अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाचा शुक्रवार, 5 जुलै रोजी भव्य संगीत सोहळा पार पडला. यामध्ये बॉलिवूड, स्पोर्ट्स आणि फॅशन जगतातील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. हे जोडपं 12 जुलै रोजी लग्न करणार आहे. 5 जुलै रोजी सलमान खान हा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या संगीत समारंभात सहभागी होण्यासाठी पोहोचला. यावेळी त्यानं काळ्या रंगाचा टक्सिडो परिधान केला. यात तो खूप सुंदर दिसत होता. रेड कार्पेटवर पोहोचलेल्या भाईजाननं पापाराझीचं हात जोडून अभिवादन केलं. या कार्यक्रमात अभिनेता रणबीर कपूर, अभिनेत्री आलिया भट्ट, आदित्य रॉय कपूर, दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग आपल्या स्टाईलिश अंदाजात दिसले.
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांची संगीत सेरेमनी :यावेळी आलियानं सुंदर काळ्या रंगाचा लेहेंगा परिधान केला. रणबीर इंडो-वेस्टर्न आउटफिटमध्ये खूपच देखणा दिसत होता. यावेळी रणबीर, आलिया आणि आदित्य यांनी रेड कार्पेटवर एकत्र पापाराझींसाठी पोझ दिली. बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित नेने अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या संगीत समारंभात सहभागी होण्यासाठी मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये पोहोचली. सोनेरी रंगाच्या चमकदार साडीत धक-धक गर्ल खूप सुंदर आणि क्यूट दिसत होती. याशिवाय सारा अली खाननं या कार्यक्रमासाठी गोल्डन लेहेंगा परिधान केला.