महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

अभिषेक बच्चननं वडील अमिताभ बच्चनबद्दल केली भावूक कमेंट, व्हिडिओ व्हायरल - AMITABH BACHCHAN AND KBC

अभिषेकनं वडील अमिताभ बच्चन यांना 'केबीसी' सीझन 16 शोदरम्यान भावूक केलंय. आता पिता-पुत्राचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Amitabh Bachchan and Abhishek
अमिताभ बच्चन आणि अभिषेक (अभिषेक बच्चन (Show Poster))

By ETV Bharat Entertainment Team

Published : Nov 19, 2024, 5:26 PM IST

मुंबई :अमिताभ बच्चन यांचा मुलगा अभिषेक लोकप्रिय शो 'कौन बनेगा करोडपती' सीझन 16 मध्ये दाखल झाला आहे. या शोमध्ये अभिषेक बच्चन त्याच्या आगामी 'आय वॉन्ट टू टॉक' या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी दिग्दर्शक शूजित सरकारबरोबर पोहोचला. शोच्या निर्मात्यांनी अभिषेक बच्चनच्या एपिसोडचा प्रोमो सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये तो शूजित सरकारबरोबर हॉट सीटवर बसून असल्याचा दिसत आहे. हॉट सीटवर बसलेल्या अभिषेकनं आपल्या कुटुंबासाठी आणि त्याचे वडील अमिताभ बच्चन यांच्याबद्दल अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या ऐकून कोणाचेही मन पिळवटून जाईल.

अभिषेकनं वडील अमिताभ यांना केलं भावूक : हॉट सीटवर बसून अभिषेक म्हटलं, "मला आशा आहे की लोकांचा पुन्हा गैरसमज होणार नाही, पण आज आम्ही इथे बसलो आहोत, आता रात्रीचे 10 वाजले आहे. सकाळी 6.30 वाजता, माझे वडील घरातून बाहेर निघाले, जेणेकरून आम्ही सकाळी 8 आणि 9 वाजेपर्यत आरामात जागे होऊ शकणार, कोणीही फारसे बोलत नाही. एक वडील आपल्या मुलांसाठी खूप काही करतात, ते पण अगदी शांतपणे." आता 'केबीसी 16'चा हा प्रोमो हा सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यावर अनेकजण आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.

घटस्फोटाच्या बातम्यांदरम्यान अभिषेक झाला केबीसीमध्ये भावूक :अभिषेक बच्चननं ही गोष्ट अशा वेळी बोलले आहे, जेव्हा त्याच्या आणि ऐश्वर्या रायच्या कथित घटस्फोटाच्या अफवा उडत आहेत. गेल्या काही दिवसांपासून अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या घटस्फोटाच्या बातम्यांनी जोर पकडला आहे. रिपोर्ट्समध्ये असं म्हटलं जात आहे की, ऐश्वर्या राय तिच्या मुलीबरोबर सासर आणि पतीपासून दूर राहत आहे. सध्या अभिषेक बच्चनचं नाव अभिनेत्री निम्रत कौरबरोबर जोडले जात आहे. दरम्यान आता व्हायरल झालेल्या प्रोमोमध्ये अभिषेक बच्चन आणि अमिताभ बच्चन यांची खूप खिल्ली उडवली जात आहे. तसेच अभिषेक बच्चन स्टारर 'आय वॉन्ट टू टॉक ' हा चित्रपट 22 नोव्हेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे.

हेही वाचा :

  1. सुनिल दत्तनाही आवडत नव्हता 'बिग बीं'चा बॅरिटोन आवाज, 'रेश्मा और शेरा'मध्ये दिली होती 'मुक्या'ची भूमिका
  2. अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या घटस्फोटाच्या अफवांदरम्यान 'बिग बीं'ची पोस्ट चर्चेत
  3. ऐश्वर्या रायकडून अफवांना पूर्णविराम, अमिताभ बच्चन यांना वाढदिवसाच्या दिल्या शुभेच्छा

ABOUT THE AUTHOR

...view details