मुंबई - Amitabh and Jaya Bachchan : मेगास्टार अमिताभ बच्चन आपल्या कुटंबीयांची किती काळजी घेतात हे आपण अनेकवेळा पाहिलं किंवा वाचलं असेल. पत्नी जया बच्चन यांच्याबद्दलही ते भरभरुन बोलतात. ज्येष्ठ अभिनेत्री असलेली जया बच्चन या कडक शिस्तीसाठी ओळखल्या जातात. पत्नीची काळजी घेताना बिग बी यांना अनेक प्रसंगात आपण पाहलियं, मग ते प्रवासात असो, आजारपणात असो की शूटिंगच्या सेटवर असो, बच्चन नेहमी पत्नीसाठीचा आदर व्यक्त करताना दिसतात.
अलिकडेच त्यांनी पोस्ट केलेला फोटो खूप काही सांगून जातो. यामध्ये अमिताभ यांनी जया बच्चन यांच्यासाठी छत्री धरली असल्याचं दिसत आहे. मंगळवारी रात्री, बिग बी यांनी त्यांच्या एक्स हँडलवर स्वतःचे आणि जया यांचा एक फोटो पोस्ट केला. याला कॅप्शन देताना त्यांनी लिहिलं, "...आणि पाऊस दररोज पडतो.. कामाच्या सेटवर देखील."
फोटोत अमिताभ बच्चन पांढरा कुर्ता पायजमा घातलेले दिसत आहेत आणि जया बच्चन यांच्यासाठी छत्री धरून पावसात फिरतानाचा हा क्षण कॅमेऱ्यात टिपला आहे. जया यांच्या हातामध्ये लाडूची प्लेट दिसत आहे. जया आणि अमिताभ यांनी 3 जून 1973 रोजी लग्न केलं होतं. त्यांना लेखिका श्वेता बच्चन नंदा आणि अभिनेता अभिषेक बच्चन ही दोन मुलं आहेत. त्यांनी 'जंजीर', 'शोले', 'अभिमान', 'मिली', 'चुपके चुपके', 'सिलसिला' आणि 'कभी खुशी कभी गम' यासह अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे.
त्यांच्या ब्लॉगमध्ये अमिताभ बच्चन यांनी फोटोंची मालिका शेअर केली आणि हंगामी पावसामुळे नकारात्मक परिणाम झालेल्या लोकांसाठी चिंता व्यक्त केली. त्यांनी लिहिलं, "आणि दिवसभर पाऊस पडतो.. कामावरही.. पावसात पाण्यातून फिरताना सर्व कलाकारांमध्ये छत्र्या मोठ्या प्रमाणात दिसतात.. आणि त्यापैकी बहुतेकांनी याचा आनंद घेतला आहे. उकाड्यात त्रस्त झाल्यानंतर मिळालेला हा थंड शिडकावा एका आशीर्वादाप्रमाणं आहे. उन्हाळ्याचे महिने .. परंतु प्रलंबीत शेतीची कामं याबरोबरच अतिवृष्टीनं विनाश आणि पूरही येतो, निसर्गाची नासधूस होते आणि ज्यांना याचा त्रास सहन करावा लागतो त्या वेदनांना कारणीभूत पाऊसच ठरतो.. दरवर्षी परिस्थितीची पुनरावृत्ती होत राहते.. दुःखद.. असहाय.. हे आहे झालेल्या विध्वंसाचे वर्णन करणे कठीण आहे.. परंतु आम्ही प्रार्थना करतो की सर्व काही बरं व्हावं."
दरम्यान, अमिताभ बच्चन 'कल्की 2898 एडी' या चित्रपटात दिसले होते. 'कल्की 2898 एडी' रिलीज झाल्यापासून, चाहते आणि फिल्म इंडस्ट्री त्यांच्या या चित्रपटातील कामगिरीवर आनंद व्यक्त करत आहेत आणि देशभरातील प्रेक्षक चित्रपटातील कलाकार आणि टीमवर कौतुकाचा वर्षाव करत आहेत. नाग अश्विन दिग्दर्शित, 'कल्की 2898 एडी' या चित्रपटात दीपिका पदुकोण, कमल हासन, प्रभास आणि दिशा पटानी यांनीही भूमिका साकारल्या होत्या.
हेही वाचा -
- Wedding Anniversary : अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्या लग्नाला 50 वर्षे पूर्ण, श्वेता बच्चनने दिल्या खास शुभेच्छा
- 'द आर्चीज' प्रीमियरमध्ये जया बच्चन पापाराझीवर भडकली, ट्रोलर्सना दिलं आमंत्रण
- अनंत-राधिकाच्या लग्नात अमिताभ आणि जया बच्चनच्या पाया पडला शाहरुख खान - Anant Radhika Wedding