मुंबई - ALLU ARJUN LATEST NEWS : अल्लू अर्जुन अलीकडे वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहे. त्याच्या बहुप्रतीक्षित 'पुष्पा २: द रुल' या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत आणि चित्रपटाभोवती बरीच चर्चा देखील सुरू आहे. दुसरं म्हणजे, 'पुष्पा 2' बद्दलच्या सर्व अनुमानांदरम्यान आणि दिग्दर्शक सुकुमार यांच्याशी झालेल्या चर्चेच्या दरम्यान, अल्लू अर्जुन त्याच्या कुटुंबासह हॉलिडेचा आनंद लुटत आहे. या दरम्यान सोशल मीडियावर आलेल्या त्याच्या फोटोमुळे चाहते मोहित झाले आहेत. उत्कंठा वाढवत, अल्लू अर्जुनची पत्नी अल्लू स्नेहा रेड्डी यांनी अलीकडेच नॉर्वे, युरोपमधील त्यांच्या सुट्टीतील एक हृदयस्पर्शी फोटो शेअर केले.
त्यांच्या नॉर्वेजियन सुट्टीतील फोटोमध्ये अल्लू स्नेहा रेड्डी यांनी एक सुंदर क्षण पोस्ट केला आहे, ज्यामध्ये अल्लू अर्जुन तिचे चुंबन घेत आहे, तर त्यांची मुलगी अर्हा खेळकरपणे मागून फोटोसाठी पोज देत आहे. अल्लू कुटुंब नॉर्वेमध्ये त्यांचा वेळ घालवत आहे, विविध पर्यटन स्थळांचा शोध घेत आहे आणि स्थानिक रेस्टॉरंटमध्ये जेवण करत आहे. ते लवकरच भारतात परततील अशी अपेक्षा आहे, त्यानंतर अल्लू अर्जुन 'पुष्पा: द रुल'चे शूटिंग पुन्हा सुरू करेल.
24 जुलै रोजी, स्नेहानं चाहत्यांना नॉर्वेमधील आणखी एक सुंदर फोटो दाखवून आनंद दिला, यामध्ये तिचे स्वतःचे, अल्लू अर्जुन आणि त्यांची मुलगी अर्हा यांच्या फोटोंचा समावेश होता. फोटो शेअर केल्यानंतर लगेचच त्याला सामंथा रुथ प्रभू, रकुल प्रीत आणि असंख्य चाहत्यांचे प्रेम मिळाले.
अलीकडे, अल्लू अर्जुन आणि दिग्दर्शक सुकुमार यांच्यात मतभेद झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. त्यानंतर अल्लू अर्जुननं त्याच्या कुटुंबासह ब्रेक घेतल्याची चर्चा आहे. निषेध म्हणून त्याने केस छाटल्याच्याही अफवा होत्या. परंतु, 'पुष्पा' टीमनं स्पष्ट केलं की त्यांच्यात सर्व काही ठीक सुरू आहे.