मुंबई : संध्या थिएटरबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाल्याच्या घटनेत साऊथ स्टार अल्लू अर्जुनच्या घरी तोडफोड करण्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी उस्मानिया यूनिवर्सिटी ज्वाइंट एक्शन कमेटीच्या सहा सदस्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हैदराबादमधील वेस्ट जोनचे डीसीपी, यांनी सांगितलं की, 'आरोपींवर कठोर कारवाई सुरू करण्यात आली आहे. तोडफोडची घटना दुपारी 4.45 च्या सुमारास घडली.' दरम्यान काही लोक घोषणाबाजी करत आणि फलक घेऊन अल्लू अर्जुनच्या घोषणाबाजी करत होते. यानंतर आंदोलकांपैकी एक व्यक्तीनं घरात घुसण्याचा प्रयत्न केला. त्यानं वॉल कंपाउंटच्या वरती चढून टोमॅटो फेकण्यास सुरुवात केली.
अल्लू अर्जुनच्या घरी दगडफेक :यानंतर त्या व्यक्तीला सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तिथून जाण्यासाठी सांगितलं , तेव्हा त्यानं त्यांच्यावर हल्ला केला. याशिवाय रॅम्पवर लावलेल्या काही फुलांच्या कुंड्या देखील या घटनेदरम्यान फुटल्या. आता सोशल मीडियावर घटनास्थळावरील फुटेज समोर आलं आहे. या दगडफेकीमुळे अल्लू अर्जुनच्या घराबाहेर खूप नुकसान झालं आहे. या घटनेबाबत अधिकाऱ्यानं सांगितलं की, "या घटनेची माहिती मिळताच जुबली हिल्स पोलिसांनी घटनास्थळ गाठले आणि सहा जणांना ताब्यात घेतलं." तसेच हे सर्वजण उस्मानिया यूनिवर्सिटी ज्वाइंट एक्शन कमेटीचा भाग असल्याचं देखील आता उघड झालं आहे.