महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

अल्लू अर्जुन स्टारर 'पुष्पा-द रुल'मधील पहिलं गाणं 'पुष्पा पुष्पा' रिलीज, पाहा व्हिडिओ - First song Pushpa Pushpa Released - FIRST SONG PUSHPA PUSHPA RELEASED

Pushpa Pushpa song out : अल्लू अर्जुन अभिनीत 'पुष्पा 2'मधील 'पुष्पा पुष्पा' गाणं रिलीज झालं आहे. या गाण्यात अल्लू धमाकेदार डान्स करताना दिसत आहे.

Pushpa Pushpa song out
पुष्पा पुष्पा गाणं रिलीज

By ETV Bharat Marathi Team

Published : May 1, 2024, 5:40 PM IST

मुंबई - Pushpa- The Rule :साऊथ चित्रपटसृष्टीतील दिग्गज निर्माते सुकुमार यांचा 'पुष्पा-द रुल' या चित्रपटाची क्रेझ चाहत्यांमध्ये सध्या प्रचंड आहे. अल्लू अर्जुन स्टारर 'पुष्पा 2' चित्रपटाबद्दल अनेकजण उत्सुक आहेत. नुकताच या चित्रपटामधील 'पुष्पा-पुष्पा' या पहिल्या गाण्याचा लेटेस्ट टीझर रिलीज करण्यात आला होता. याशिवाय आज 1 मे रोजी एक पोस्टर रिलीज करून या चित्रपटामधील पहिलं गाणं 'पुष्पा-पुष्पा' कधी रिलीज होणार असल्याचं निर्मात्यांनी सांगितलं होतं. 'पुष्पा-पुष्पा' हे गाणं आज सकाळी 11 वाजता रिलीज होणार होतं, मात्र काही कारणामुळे हे गाणं संध्याकाळी 5.04 वाजता तेलुगु, हिंदी, तमिळ, कन्नड, मल्याळम आणि बंगालीमध्ये रिलीज केलं गेलं आहे.

'पुष्पा-पुष्पा' गाणं झालं रिलीज :'पुष्पा-पुष्पा' या गाण्याची सुरुवात खूप धमाकेदार आहे. या गाण्यात अल्लू अर्जुननं जबरदस्त डान्स करून चाहत्यांची मनं जिंकली आहेत. आता अनेकजण पोस्ट करून या गाण्यावर कौतुकाचा वर्षाव करताना दिसत आहेत. या गाण्यात अल्लू खूप हटके दिसत आहे. 'पुष्पा-द रुल' या चित्रपटाची टक्कर ही रोहित शेट्टीच्या 'सिंघम अगेन'बरोबर होताना बॉक्स ऑफिसवर दिसणार आहे. हे दोन्ही चित्रपट बड्या बजेटचे आहेत. त्यामुळे अनेकांना या दोन्ही चित्रपटाकडून खूप अपेक्षा आहेत. दरम्यान 'पुष्पा-पुष्पा' गाण्यामधील नवीन दमदार पोस्टर देखील रिलीज करण्यात आलं होतं. हे पोस्टर देखील चाहत्यांना खूप आवडलं आहे.

'पुष्पा-पुष्पा' स्टार कास्ट : अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना यांचा हा चित्रपट यंदाच्या स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. एका रिपोर्टनुसार 'पुष्पा 2' तब्बल 500 कोटींच्या बजेटमध्ये बनवण्यात आला आहे. याशिवाय या चित्रपटाच्या निर्मात्यांनी जगभरातील संगीत हक्क आणि हिंदी उपग्रह हक्क टी-सीरीजला 60 कोटी रुपयांना विकले आहेत. या चित्रपटामध्ये अल्लू अर्जुन व्यतिरिक्त रश्मिका मंदान्ना, फहाद फाजिल, प्रियामणी, श्रीतेज, अनसुया भारद्वाज, विजय सेतुपती, दिवी वध्या, जगपती बाबू, प्रकाश राज, राव रमेश, सुनील आणि इतर कलाकार दिसणार आहेत.

हेही वाचा :

  1. खळबळजनक! सलमान खान गोळीबार प्रकरणातल्या आरोपीनं लॉकअपमध्ये केली आत्महत्या - Salman Khan shooting case
  2. 'पुष्पा 2'च्या निर्मात्यानं शेअर केलं नवीन पोस्टर, पाहा अल्लू अर्जुनचा दमदार लूक - pushpa 2
  3. अक्षय कुमार स्टारर 'हाऊसफुल 5'चं शूटिंग ऑगस्टपासून यूकेमध्ये होणार सुरू - housefull 5

ABOUT THE AUTHOR

...view details