मुंबई : थिएटरमध्ये चार आठवडे होऊनही, 'पुष्पा 2' चांगली कामगिरी करत आहे. सध्या अल्लू अर्जुन, रश्मिका मंदान्ना आणि फहद फासिल स्टारर, मास ॲक्शन चित्रपट बॉक्स ऑफिसवर नवे विक्रम प्रस्थापित करत आहे. वर्षातील सर्वात मोठ्या ब्लॉकबस्टर चित्रपटांपैकी एक 'पुष्पा 2' आहे. या चित्रपटानं चौथ्या शनिवारी (24व्या दिवशी) 12.5 कोटी रुपयांची कमाई केली. 'पुष्पा 2'नं एकूण देशांतर्गत कलेक्शन 1141.35 कोटीचं केलंय. हा चित्रपट अनेक भाषांमधील दमदार कामगिरी करत आहे. चौथ्या आठवड्यातही 'पुष्पा 2' चित्रपटानं हिंदीमध्ये चांगली कामगिरी केली.
सॅकनिल्कच्या ट्रेड पोर्टलनुसार, देशांतर्गत कलेक्शन
तेलुगू: रु. 2.1 कोटी
हिंदी: 10 कोटी रुपये
तमिळ: 0.35 कोटी
कन्नड: 0.04 कोटी
मल्याळम: 0.01 कोटी
आठवड्याचे देशांतर्गत नेट कलेक्शन
पहिला आठवडा ड 725.8 कोटी
दुसरा आठवडा 264.8 कोटी
तिसरा आठवडा128.6 कोटी
तेवीस दिवस 8.75 कोटी
चौवीस दिवस 12.5 कोटी (प्रारंभिक अंदाज)
एकूण कलेक्शन. 1141.35 कोटी
'पुष्पा 2'चं ग्लोबल बॉक्स ऑफिस कलेक्शन : रिलीज झाल्यापासून 'पुष्पा 2'नं फक्त भारतीय बॉक्स ऑफिसवरच वर्चस्व गाजवले नाही, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही दमदार कामगिरी केली आहे. जगभरातील बॉक्स ऑफिसवर या चित्रपटानं आतापर्यंत 1700 कोटींचा टप्पा ओलांडून विजयचा झेंडा रोवला आहे. अल्लू अर्जुनच्या पात्राची, पुष्पा राजची लोकप्रियता आणि हाय-ऑक्टेन ॲक्शनच्या पार्श्वभूमीवर तयार करण्यात आलेल्या मनमोहक चित्रपटानं प्रेक्षकांच मन जिंकलं आहे. 'पुष्पा 2' हे अल्लू अर्जुन आणि दिग्दर्शक सुकुमार यांच्यातील चौथे सहकार्य आहे. 'पुष्पा 2' चित्रपटाची निर्मिती तीन वर्षांहून अधिक काळापासून सुरू आहे. आकर्षक कथानकापासून ते दमदार परफॉर्मन्सपर्यंत 'पुष्पा 2'मधील अनेक गोष्टी आकर्षक आहे.
अल्लू अर्जुनवरचं संकट : अलीकडेच, हैदराबादमध्ये प्रीमियरच्या वेळी झालेल्या एका दुःखद घटनेनंतर हा चित्रपट खूप चर्चेत आला होता. प्रीमियरमध्ये चेंगराचेंगरीत एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि तिच्या लहान मुलाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. ही घटना घडल्यानंतर देखील चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कामगिरीवर परिणाम झाला नाही. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून पाठिंबा आणि प्रेम मिळत आहे.
हेही वाचा :
- अल्लू अर्जुनसह तेलुगू इंडस्ट्रीचे दिग्गज घेणार मुख्यमंत्र्यांची भेट, चेंगराचेंगरीच्या घटनेनं धास्तावले निर्माते
- संध्या थिएटर प्रकरणी अल्लू अर्जुनची चौकशी पूर्ण, चौकशीत काय घडलं जाणून घ्या...
- अल्लू अर्जुन चिक्कडपल्ली पोलीस ठाण्यात दाखल, संध्या थिएटर प्रकरणी चौकशीचा ससेमिरा सुरू