मुंबई - अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2: द रुल' हा चित्रपट आज 5 डिसेंबर रोजी जागतिक स्तरावर 12,500 स्क्रीन्सवर रिलीज झाला आहे. चित्रपटाबद्दल तयार झालेलं आकर्षण केवळ अभूतपूर्व आहे. 'पुष्पा 2' बॉक्स ऑफिसच्या शर्यतीत एक गेम चेंजर बनण्यासाठी तयार आहे.
जगभरात 250 कोटींचा गल्ला पार करणारा 'पुष्पा 2' पहिला चित्रपट आहे. हा सिनेमा रिलीजच्या सुरुवातीच्या दिवशी बॉक्स ऑफिस रेकॉर्ड तोडेल अशी अपेक्षा आहे. इंडस्ट्रीतील जाणकारांनी असा अंदाज वर्तवला आहे की, हा चित्रपट जगभरात 270 कोटी रुपयांची कमाई करु शकेल. हा पराक्रम गाजवणारा अल्लू अर्जुन इतिहासातील पहिला अभिनेता बनला आहे. पहिल्या भागाच्या यशानंतर निर्माण झालेल्या अपेक्षेमुळे हा चित्रपट संपूर्ण भारतातील अनेक राज्यामध्ये वर्चस्व गाजवेल असा अंदाज आहे.
जाणकारांनी व्यक्त केलेला 270 कोटीचा अंदाज खरा ठरला, तर पुष्पा 2 'आरआरआर'चा ओपनिंग डे रेकॉर्ड मोडेल. जगभरातील 257 रुपयांच्या कमाईसह, आरआरआरने आतापर्यंत भारतीय चित्रपटासाठी सर्वाधिक ओपनिंग डेचा विक्रम केला आहे.
पुष्पा 2 च्या अपेक्षित ओपनिंग डे कलेक्शनचा तपशील
- आंध्र प्रदेश/तेलंगणा: रु. ९० कोटी
- कर्नाटक: 15 कोटी
- तामिळनाडू: 8 कोटी
- केरळ : ७ कोटी
- उर्वरित भारत: 80 कोटी
- एकूण भारत: 200 कोटी रुपये
- परदेशी बाजार: 70 कोटी
- जगभरातील एकूण प्रक्षेपण: 270 कोटी