मुंबई - Allu Arjun Viral Video : अल्लू अर्जुन हा चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2' लवकरच चित्रपट चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, आता एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये अल्लू अर्जुन एका त्याच्या चाहत्याचं सांत्वन करताना दिसत आहे. व्हायरल व्हिडिओनं सर्वांची मने जिंकली आहेत. अल्लू अर्जुनला पहिल्यांदा पाहून चाहत्यांना रडू कोसळले. आता या व्हिडिओवर अनेकजण कमेंट्स करून अल्लू अर्जुनचे कौतुक करताना दिसत आहेत. अल्लू अर्जुन आगामी चित्रपट 'पुष्पा: द रुल'चे शूटिंग करत आहे. काही दिवसांपूर्वी तो त्याच्या आगामी चित्रपटाच्या पुढील शेड्यूलसाठी विशाखापट्टणमला पोहोचला होता.
अल्लू अर्जुननं भावूक चाहत्याचे केले सांत्वन :तेथे उपस्थित असलेल्या शेकडो चाहत्यानं अल्लू अर्जुनचं भव्य स्वागत केलं. आता त्याच्या स्वागताचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सुकुमार दिग्दर्शित 'पुष्पा: द रुल' 15 ऑगस्ट 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार येत्या काही आठवड्यात हा चित्रपट पूर्ण होऊ शकतो. फहद फासिल आणि रश्मिका मंदान्ना 'पुष्पा-2' मध्ये अल्लू अर्जुनबरोबर दिसणार आहेत. 'पुष्पा-2' 2021 च्या 'पुष्पा: द राइज'चा सीक्वेल आहे. हा चित्रपट रेडवूड तस्करीवर आधारित होता. आता 'पुष्पा-2' चित्रपटाची स्टोरी पुढे काय असणार यासाठी अनेकजण उत्सुक आहेत. याआधी 'पुष्पा-2' मधील अल्लू अर्जुनचं लूक समोर आलं होत. या लूकमध्ये तो साडी घालून थरारक दिसत होता.