मुंबई -बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टनं अलीकडेच तिच्या भविष्यातील योजनांचा खुलासा केलाय. तिला राहानंतर आणखी मुले हवी असल्याचं तिनं एका संवादादरम्यान सांगितलंय. रणबीर कपूर आणि आलिया भट्ट नोव्हेंबर 2022 मध्ये आई-वडील झालेत आणि त्यांनी राहाचं स्वागत केलं. अलीकडेच एका पत्रकार परिषदेत आलियाला विचारण्यात आलं की, ती तिच्या भविष्याबद्दल काय प्लॅनिंग करीत आहे. यानंतर तिनं आपल्या भविष्यातील काही योजना उघड केल्यात. राहाविषयी बोलताना आलियानं बऱ्याचं सुंदर गोष्टी तिच्या कुटुंबाबद्दल सांगितल्यात.
आलिया भट्टची भविष्यातील योजना : यात तिनं म्हटलं की, 'मला वाटतं, 'माझ्यासाठी 'स्टुडंट ऑफ द इयर' हा सर्वात अप्रतिम चित्रपट आहे, जो मुलं पाहू शकतात आणि हा माझा पहिला चित्रपट आहे. त्या चित्रपटात माझा फारसा अभिनय नसला तरी, यात चांगली गाणी आहेत आणि राहा हे नक्कीच एन्जॉय करेल, असे मला वाटते. याशिवाय रणबीरचा 'बर्फी' चित्रपटदेखील चांगली निवड असेल.' यानंतर आलियाला तिच्या भविष्यातील योजनांबद्दल सांगितलं की,'मला आशा आहे की, मी अनेक चित्रपट करेन, निर्माता म्हणून चित्रपट करायला आवडेलं.अधिक मुले व्हावीत, खूप प्रवास करवा. निरोगी आणि साधे जीवन जगावं असे मला वाटते.' आलिया मुलाच्या मुद्द्यावर बोलत असताना, ती भविष्यात मुलाला जन्म देण्याचा विचार करत असल्याचं दिसून यावेळी आलं.