मुंबई - Alia Bhatt Deepfake Video :रश्मिका मंदान्ना, कतरिना कैफ, काजोल आणि रणवीर सिंग यांच्यानंतर आता आणखी एक बॉलिवूड सेलिब्रिटी डीपफेकची बळी ठरली आहे. अभिनेत्री आलिया भट्टचा डीपफेक व्हिडिओ नुकताच समोर आला आहे. तिचा चेहरा एका पंजाबी अभिनेत्रीच्या चेहऱ्यावर लावण्यात आला असून हा व्हिडिओ प्रचंड वेगानं व्हायरल होत आहे. पंजाबी अभिनेत्री वामिका गब्बीनं 27 एप्रिल रोजी तिच्या इन्स्टाग्रामवर अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये तिचा लूक खूप सुंदर होता. तिनं फोटोशूट केले होते. याशिवाय या व्हिडिओमध्ये 'अमर सिंह चमकीला' मधील एक गाणं देखील वाजत आहे.
आलिया भट्ट पुन्हा बनली डीपफेकची शिकार :इन्स्टाग्रामवर डीपफेकचा व्हिडिओही व्हायरल झाल्यानंतर अनेक चाहत्यांनी याप्रकरणी चिंता व्यक्त केली आहे. वामिका गब्बीच्या चेहऱ्यावर, आलियाचा चेहरा लावण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये आलिया ही स्पष्टपणे दिसत आहे आणि चाहतेही यावर संताप व्यक्त करत आहेत. या व्हिडीओवर कमेंट करताना चाहते अनेक प्रश्न विचारताना दिसत आहेत. एका चाहत्यानं या पोस्टवर लिहिलं, "हे कायदेशीर आहे का? तुम्ही आलियाचा चेहरा वापरत आहात." दुसऱ्या एकानं लिहिलं, "वामिका गब्बी आलिया भट्टची सस्ती कॉपी आहे." आलियाचा चेहरा एआय टूलद्वारे बदलण्यात आला आहे.