महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

अक्षय कुमारनं 14 वर्षांनंतर प्रियदर्शनबरोबर 'भूत बंगला'ची केली घोषणा, फर्स्ट लुक रिलीज - Akshay Kumar - AKSHAY KUMAR

Akshay Kumar announces Bhooth Bangla : अक्षय कुमारनं त्याच्या 57व्या वाढदिवशी 'भूत बंगला' त्याच्या नवीन हॉरर कॉमेडी चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटातील फर्स्ट लुक शेअर करून त्यानं रिलीज वर्षाबाबत माहिती दिली आहे.

Akshay Kumar announces Bhooth Bangla
अक्षय कुमारनं 'भूत बंगला'ची केली घोषणा (अक्षय कुमार (Movie Poster))

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 9, 2024, 12:13 PM IST

मुंबई Akshay Kumar birthday : बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार आज 9 सप्टेंबर रोजी त्याचा 57 वा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्तानं त्याचे चाहते आणि अनेक सेलिब्रिटी त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. दुसरीकडे अक्षयनं त्याच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांना एक सुंदर भेट दिली आहे. त्याने आज 9 सप्टेंबर रोजी आपला नवीन हॉरर कॉमेडी चित्रपट 'भूत बंगला' ची घोषणा केली आहे. याबरोबरच त्यानं 'भूत बंगला' चित्रपटामधील एक मजेदार पोस्टरही शेअर केलं आहे. यापूर्वी अक्षयनं 'भूल भुलैया' या चित्रपटातून देखील रुपेरी पडद्यावर धमाका केला होता. 'भूत बंगला' चित्रपटातील अक्षय कुमारचा फर्स्ट लूक खूपच इंटरेस्टिंग आहे.

अक्षय कुमारनं केली नवीन चित्रपटाची घोषणा :पोस्टरमध्ये अक्षय कुमारच्या खांद्यावर एक काळी मांजर बसली असल्याचं दिसत आहे. याशिवाय अक्षयच्या हातात एक वाटी आहे, यात दूध असून अक्षय त्याला जीभ लावताना दिसत आहे. याशिवाय त्यातच्या मागे एक भुतानं पछाडलेला बंगला दिसत आहे. अक्षयनं शेअर केलेलं पोस्टर आता त्याच्या चाहत्यांना खूप आवडत आहे. या पोस्टरवर अनेकजण कमेंट्स करून आपल्या प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. अक्षयनं आता रोमान्समधून बाहेर पडून हॉरर चित्रपटांमध्ये काम करण्याचा विचार केला आहे. अक्षय 14 वर्षांनंतर प्रियदर्शनबरोबर काम करणार आहे. त्याला या चित्रपटाकडून खूप अपेक्षा आहेत. कारण त्याचे आतापर्यंत अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाले आहेत. आता तो या चित्रपटाद्वारे नक्कीच चाहत्याचं मन जिंकेल अशी आशा आहे.

'भूत बंगला' चित्रपटाची निर्मिती :अक्षय कुमारच्या या चित्रपटाबाबत 9 सप्टेंबर रोजी मोठी अपडेट मिळणार आहे, हे आधीच त्यानं सांगितलं होतं. आता त्याच्या चित्रपटाचं शीर्षक समोर आलं आहे, त्यामुळे त्याचे चाहते खूप खुश आहेत. या चित्रपटामधील बाकीच्या स्टारकास्टची घोषणा अद्याप झालेली नाही. हा चित्रपट पुढील वर्षी 2025 मध्ये रुपेरी पडद्यावर धडकेल. 'भूत बंगला' चित्रपटाची निर्मिती बालाजी टेलिफिल्म्स आणि केप ऑफ गुड्स फिल्म्स यांनी संयुक्तपणे केली आहे. या चित्रपटाच्या निर्मात्या एकता कपूर आणि शोभा कपूर आहेत.

हेही वाचा :

  1. अक्षय कुमारचा 'हा' चित्रपट 'स्त्री 2'ला देणार टक्कर, वाढदिवसानिमित्त करणार मोठी घोषणा - Akshay Kumar
  2. प्रियदर्शनबरोबर अक्षय कुमार त्याच्या वाढदिवशी हॉरर कॉमेडी चित्रपटाची करणार घोषणा - Akshay Kumar
  3. अक्षय कुमारनं मुंबईतल्या घराबाहेर गरजूंना केलं अन्नदान, चाहत्यांनी केलं कौतुक - Akshay Kumar video

ABOUT THE AUTHOR

...view details