महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

अजय देवगणनं लॉन्च केलं 'आझाद'चं शीर्षक, आमान देवगण करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण

AZAAD TITLE LAUNCH अजय देवगणचा पुतण्या आमान देवगण आणि रवीना टंडनची मुलगी राशा बॉलिवूड पदार्पण करत आहेत. त्यांच्या आझाद या चित्रपटाचा शीर्षक लॉन्च झालं आहे.

AZAAD TITLE LAUNCH
'आझाद'चं शीर्षक पोस्टर (ANI)

By ETV Bharat Entertainment Team

Published : 5 hours ago

मुंबई - अजय देवगणचा पुतण्या आमान बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याची प्रतीक्षा आता संपली असून निर्मात्यांनी चित्रपटाचं पहिलं पोस्टर जारी केलं आहे. या चित्रपटाचं शीर्षक आझाद असणार आहे. हे शीर्षक अजय देवगण यानं लॉन्च केलं आहे.

आझाद नावाच्या या चित्रपटात अजय देवगण महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार असून आणि पुतण्या आमान देवगण आणि रवीना टंडनची मुलगी राशा थडानी सिनेक्षेत्रात आपलं पहिलं पाऊल टाकणार आहेत. या दिवाळीत चित्रपटाचा टीझर रिलीज होणार आहे.

अजय देवगणनं त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर आझादच्या फर्स्ट-लूक पोस्टरचं लॉन्चिंग केलं. राशा थडानी आणि आमान देवगण यांच्या पदार्पणाच्या या चित्रपटाच्या पोस्टरवर घोड्यावर स्वार झालेल्या युवकाचा साहसी अवतार दिसत आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, "कहानी यारी की. कहानी वफादारी की. कहानी आझाद की! आझाद चित्रपटाचा टिझर या दिवाळीत खास सिनेमांमध्ये प्रदर्शित होत आहे. हा साहसी चित्रपट जानेवारी 2025 मध्ये सिनेमागृहात मोठ्या पडद्यावर येणारे आहे!" या चित्रपटाचा टिझर 'सिंघम अगेन' आणि 'भूल भुलैया 3' या दिवाळीत रिलीज होणाऱ्या चित्रपटाबरोबरच थिएटरमध्ये झळकणार आहे.

'काई पो चे', 'केदारनाथ', 'रॉक ऑन' आणि 'चंडीगढ़ करे आशिकी' सारख्या चित्रपटांसाठी ओळखला जाणारा अभिषेक कपूर या आझाद चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहे. सिने उद्योगातील दिग्गज रॉनी स्क्रूवाला आणि प्रज्ञा कपूर निर्मित, 'आझाद' हा चित्रपट जानेवारी 2025 मध्ये मोठ्या पडद्यावर रिलीज होणार आहे.

प्रसिद्ध अभिनेत्री रवीना टंडन आणि निर्माता अनिल थडानी यांची मुलगी राशा थडानी आझाद या थ्रिलर चित्रपटासह बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवण्यासाठी सज्ज झाले आहेत. अभिषेक कपूर दिग्दर्शित, या चित्रपटाने आधीच चर्चा निर्माण केली आहे कारण ती अजय देवगणचा पुतण्या आमन देवगणसोबत स्क्रीन स्पेस शेअर करणार आहे. राशाचे बॉलिवूडमधील मजबूत घराणे आणि तिच्या आईचे स्टारडम लक्षात घेता, राशाचे पदार्पण हे बहुप्रतिक्षित आहे. तर आमान याच्यासाठी आझाद हा प्रोजेक्ट खास असणार आहे. तो देवगण कुंटुंबातील असल्यामुळं त्याच्याकडून मोठ्या अपेक्षा बाळगल्या जात आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details