मुंबई - Son of Sardaar 2 shoot:'सन ऑफ सरदार'च्या सीक्वेलची प्रतीक्षा संपली आहे. बऱ्याच दिवसांपासून 'सन ऑफ सरदार 2'ची चर्चा ही सोशल मीडियावर होताना दिसत होती. दरम्यान आज 6 ऑगस्ट रोजी अजय देवगणनं त्याच्या 'सन ऑफ सरदार 2' चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. 5 ऑगस्टला अजय देवगणनं पत्नी काजोलचा वाढदिवस साजरा केला. दरम्यान अजयनं सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये अजय 'सन ऑफ सरदार 2' चित्रपटाच्या शूटिंग सेटवर पूजा करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये, 'सन ऑफ सरदार 2' चित्रपटाच्या सेटवरून काही दृश्यं समोर आली आहेत. यात मुख्य अभिनेत्री मृणाल ठाकूरचा 'देसी लूक' दिसत आहे.
मृणाल ठाकूरचा पंजाबी लूक :व्हिडिओत अजय देवगण गुरुद्वारामध्ये प्रार्थना करताना दिसतोय आणि त्यानंतर त्याचा मुलगा आणि पुतण्या 'सन ऑफ सरदार 2' चित्रपटाचा क्लॅपबोर्ड हातात धरताना दिसतात. यानंतर चित्रपटाचे दिग्दर्शक विजय कुमार अरोरा काही सूचना देतात. व्हिडिओत चित्रपटाची मुख्य अभिनेत्री मृणाल ठाकूर देसी पंजाबी लूकमध्ये ढोल वाजवते आणि चंकी पांडे ढोलाच्या तालावर नाचतो. अजय देवगण सेटवर सरदारजीच्या भूमिकेत दिसतो. हा व्हिडिओ शेअर करत अजयनं यावर लिहिलं, "सन ऑफ सरदार 2' चित्रपटाचा प्रवास, प्रार्थना, आशीर्वाद आणि अप्रतिम टीमनं सुरू होत आहे."