महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

"सर्वांचा खूप अभिमान वाटला", म्हणत कियारा अडवाणीनं केलं पती सिद्धार्थच्या 'योद्ध्या'चं कौतुक - Kiara Advani praised cast and crew

अभिनेत्री कियारा अडवाणीनं तिचा पती सिद्धार्थ मल्होत्राचा 'योद्धा' चित्रपट पाहून आपली प्रतिक्रिया दिली आहे. हा चित्रपट सर्वोत्कृष्ट झाल्याचं सांगत तिनं चित्रपटाच्या सर्व टीमचं कौतुक केलंय. सर्वांचा अभिमान वाटल्याचंही ती म्हणाली.

Kiara Advani and Siddharth Malhotra
कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 15, 2024, 10:10 AM IST

मुंबई - अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रासाठी आज उगवलेला दिवस खूप महत्त्वाचा आहे. त्याचा अ‍ॅक्शन-पॅक्ड चित्रपट 'योद्धा' आज रिलीज होत आहे. सिद्धार्थची पत्नी आणि अभिनेत्री कियारा अडवाणीही 'योद्धा'च्या संपूर्ण टीमप्रमाणेच याचे यश पाहण्यासाठी कमालीची उत्साहित झाली आहे. गुरुवारी रात्री तिने मुंबईत एका स्पेशल स्क्रिनिंगमध्ये तिच्या संपूर्ण कुटुंबासह हा चित्रपट पाहिला. चित्रपट पाहिल्यानंतर तिनं दिलेला रिव्ह्यू सिद्धार्थच्या चेहऱ्यावर स्मितहास्य उमटवणारा आहे.

कियारा अडवाणीनं केलं पती सिद्धार्थच्या 'योद्ध्या'चं कौतुक

कियारा अडवणीने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये शुक्रवारी सकाळी लिहिले, "खूपच उत्कृष्ट. करण जोहर, शशांक खेतान, धर्मा मुव्हिज आणि सिद्धर्थ मल्होत्रा, तुम्हा सर्वांचा आम्हाला खूप अभिमान वाटला! तुमचा हा चित्रपट सर्वोत्तम आहे."

"जॉनरमधील योद्धा हा एक सर्वोत्कृष्ट चित्रपट आहे. सागर आंब्रे आणि पुष्कर ओझा, विश्वासच बसत नाही का हा तुमचा पहिलाच दिग्दर्शकिय चित्रपट आहे. दिशा पटानी, राशि खन्ना या दोन महिला योद्ध्यांसाठी चित्रपट पाहिला. चित्रपटाचे सर्व कलाकार आणि क्रू मेंबर्स यांनी चित्रपटात इंद्रधनुष्य प्रमाणे रंग भरले." असे कियारा पुढं म्हणते.

'योद्धा' चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनिंगला सिद्धार्थ मल्होत्राची आई, वडील, भाऊ आणि मेहुणेही उपस्थित होते. सिद्धार्थला चिअर करण्यासाठी ते दिल्लीहून आले होते. स्क्रिनिंगला कियाराचे आई आणि वडीलही उपस्थित होते. या सर्वांनी पापाराझी फोटोग्राफर्ससाठी फोटोंना पोजही दिल्या.

सागर आंब्रे आणि पुष्कर ओझा या नवोदित जोडीने दिग्दर्शित केलेला, हा हाय-ऑक्टेन अ‍ॅक्शन थ्रिलर चित्रपट एका उत्कंठावर्धक बचाव मोहिमेवर आधारित आहे. यामध्ये टास्क फोर्स या एलिट युनिटचा कमांडिंग ऑफिसर अरुण कात्याल प्रवाशांना वाचवण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करताना दिसतो.

चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अलिकडेच सिद्धार्थ दिल्लीला गेला होता. या कार्यक्रमात त्यांनी या चित्रपटाबद्दल जोरदार भाष्य केले होते. तो म्हणाला, "योद्धा ही पूर्णपणे काल्पनिक कथा आहे. आम्ही एक नवीन टास्क फोर्स तयार केला आहे 'योद्धा'. त्यामुळे जेव्हा तुम्ही शून्यातून एखादी गोष्ट तयार जात असाल तेव्हा तुम्ही खूप स्वातंत्र्य घेऊ शकता. आम्ही चित्रपटात आणि अ‍ॅक्शनमध्येही अनेक वेगळेपण आणली आहेत. 'शेरशाह' पेक्षा मला यात परफॉर्म करायला मिळाले हे खूप वेगळं आहे. इथे मी अधिक उत्साही, दुबळा आहे, आणि शत्रूला धूळ चारण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची शस्त्रे वापरतो. हा चित्रपट जास्त व्यावसायिक आणि मनोरंजक चित्रपट आहे. मला वाटतं की यात गेल्या दशकभरातील माझे सर्वोत्कृष्ट अ‍ॅक्शन सिक्वेन्स आहेत."

'योद्धा' या चित्रपटाची निर्मिती हिरू यश जोहर, करण जोहर, अपूर्व मेहता आणि शशांक खेतान यांनी केली आहे.आज 15 मार्च रोजी हा चित्रपट देशात सर्वत्र थिएटरमध्ये दाखल झाला आहे.

हेही वाचा -

  1. Bhool Bhulaiya 3 Shoot: पाय फ्रॅक्चर असतानाही अनीस बज्मी करतोय 'भूल भुलैया 3' चे शुटिंग, कार्तिक आर्यनचा प्रेरणादायी अनुभव
  2. Aamir Khan Birthday Special: मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानचे संस्मरणीय कॉमिक चित्रपटांचे सेलिब्रेशन
  3. Bhaiyya Ji Poster: 'भैय्या जी' चित्रपटामधील मनोज बाजपेयीचे फर्स्ट लूक पोस्टर रिलीज

ABOUT THE AUTHOR

...view details