मुंबई - Kiara Advani Look From Game Changer Leaked : साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील अभिनेता राम चरणचा बहुप्रतीक्षित आगामी 'गेम चेंजर' चित्रपटाच्या प्रदर्शनाची प्रचंड उत्सुकता चाहत्यांमध्ये आहे. कियारनं याआधी साऊथ चित्रपट 'विनया विधेया रामा' आणि 'भरत अणे नेणू'मध्ये काम केलं आहे. आता ती पुन्हा एकदा 'गेम चेंजर' या चित्रपटातून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी येत आहे. सध्या 'गेम चेंजर' चित्रपटाच्या अपडेट्सवर प्रेक्षकांची नजरा खिळलेल्या आहेत. 'गेम चेंजर'मधून राम चरणचा लूक लीक झाल्यानंतर आता कियारा अडवाणीची या चित्रपटामधील झलक समोर आली आहे, ज्यामध्ये ती साध्या साडीत दिसत आहे.
'गेम चेंजर'मधील कियारा अडवाणीचं सिंपल लूक : कियारा अडवाणीचा एक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये कियारा अडवाणी तिच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगसाठी विशाखापट्टणममध्ये फिरताना दिसत आहेत. फोटोत कियारा अडवाणीनं क्रीम रंगाच्या ब्लाउजसह सोनेरी बॉर्डर असलेली गडद जांभळ्या रंगाची साडी नेसली आहे. यावर तिनं कानातले आणि बिंदी देखील घातली आहे. याशिवाय तिनं पोनीटेलमध्ये केस बांधलेले आहेत. या सिंपल लूकमध्ये कियारा खूपच क्यूट दिसत आहे. 'गेम चेंजर' हा चित्रपट खूप दिवसांपासून चर्चेत आहे.