मुंबई - गेल्या काही दिवसापासून सोशल मीडियावर आणि वृत्तपत्रांपासून टीव्ही मीडियावर 'मराठी बिग बॉस' फेम सूरज चव्हाणचीच चर्चा आहे. त्यानं आपलं नाव ट्रॉफीवर कोरल्यानंतर अभिजीत चव्हाणपासून सर्वच स्पर्धकांनी त्याचं कौतुक केलंय. शोचा होस्ट रितेश देशमुखही त्याचं गुण गाताना थकत नाही. खरंतर सामान्य घरातून आलेला एक निरागस मुलगा अशी त्याची ओळख शोमधून निर्माण झाली, त्याला लोक ओळखायला लागले, जे लोक त्याला फॉलो करत नव्हते अशांनीही त्याची रील्स पाहायला सुरुवात केली आणि दिवसेंदिवस त्याच्या लोकप्रियतेत भर पडली.
बिग बॉसमध्ये झेंडा फडकवल्यानंतर' सूरज चव्हाण पुन्हा सज्ज, 'केजीएफ'ची फायरींग वाजली - REELS STAR SURAJ CHAVAN
रील्स स्टार सूरज चव्हाण मराठी बिग बॉसचा विजेता ठरला. आता तो पुन्हा आपल्या केजीएफ बाईकवरुन रील्ससाठी पुन्हा सज्ज होतोय.
By ETV Bharat Entertainment Team
Published : Oct 16, 2024, 1:14 PM IST
बिग बॉस जिंकल्यानंतर तो आपल्या गावी धूमधडाक्यात पोहोचला. गावकऱ्यांनी त्याचं जोरदार स्वागत केलं. मीडियाच्या लोकांनीही त्याला घेरायला सुरुवात केली. स्थानिक राजकारण्यांपासून ते मंत्र्यापर्यंत पुढऱ्यांनी त्याचं अभिनंदन केलं आणि सेल्फीही काढल्या. पण मरीआईचं दर्शन घेताना त्यानं निरागसपणे 'बूमवाल्या' मीडिया रिपोर्टर्सना गप्प केलं ते लोकांना खूप आवडलं. त्याचे चाहते त्याला भेटण्यासाठी, त्याच्याबरोबर सेल्फी घेण्यासाठी खूप कष्ट घेत आहेत. अशा वेळी तो पुढं काय करणार याचीही उत्कंठा लोकांना लागून राहिली आहे.
बिग बॉसच्या विजेता होत असतानाच सूरज चव्हाणला घेऊन चित्रपट बनवणार असल्याची घोषणा मराठी चित्रपटाचे ख्यातनाम दिग्दर्शक केदार शिंदे यांनी जाहीर केलं होतं. हा चित्रपट यायला वेळ असला तरी यापूर्वी त्यानं काम केलेले रील्स् आणि गाणी याची प्रतीक्षा चाहत्यांना आहे. प्रसिद्धीची हवा लागू न देता सूरजनं पुन्हा एकदा आपल्या रील्सच्या कामाला सुरुवात केली आहे. त्यानं यापूर्वी रील्समध्ये हवा निर्माण करण्यासाठी एक दुचाकी घेतली होती आणि त्याला तो यशच्या 'केजीएफ'ची बुलेट समजत होता. पुन्हा एकदा तो आता या केजीएफ बाईकवरुन फायरींग करणार आहे. त्याचं नवं रील अजून बनलेलं नाही, परंतु त्याच्या गाजलेल्या रिहर्सलमधील एक टेक सूरजचा दोस्त सूरज पवारनं इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.