मुंबई Amruta Fadnavis :उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस सध्या प्रचंड चर्चेत आहेत. अमृता यांनी एका वृत्त वाहिनीला मुलाखत दिली, ही मुलाखत आता खूप चर्चेत आली आहे. त्यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल एक विधान केलं आहे. 'होऊ दे चर्चा...कार्यक्रम आहे घरचा!' या शोमध्ये सोनाली कुलकर्णीनं घेतलेली मुलाखत आता सध्या सोशल मीडियावर एक चर्चेचा विषय बनला आहे. या मुलखतीदरम्यान सोनाली अमृता यांना गाणं गाण्यास देखील लावते. आता सोशल मीडियावर सोनालीनं या कार्यक्रमामधील काही व्हिडिओ क्लिप चाहत्यांबरोबर शेअर केल्या आहेत.
अमृता फडणवीस यांचा व्हिडिओ व्हायरल :या व्हिडिओमध्ये अमृता फडणवीस यांनी केलेलं वक्तव्यावर अनेकजण प्रतिक्रिया देत आहेत. सोशल मीडियावर अमृता फडणवीस यांना सध्या ट्रोल केलं जात आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये अमृता यांनी म्हटलं, "धरण उशाला कोरड घशाला असं म्हटलं जातं, देवेंद्रजी माझ्यासमोर येतात आणि जातात. रोज दिसतात पण त्यांचा हात धरुन मजा मस्ती करताच येत नाही. धरण उशाला असतं आणि कोरड घशाला. यानंतर सोनाली विचारते की, "देवेंद्रजी रोमँटिक आहेत का?" त्यावर अमृता फडणवीस या म्हणतात, "नाही देवेंद्र फडणवीस कधीच रोमँटिक नव्हते. लग्नाच्या आधीही नाही आणि नंतरही नाही, देवेंद्रजी प्रॅक्टीकल आहेत मी रोमँटिक आहे, त्यांना रोमान्स कळतही नाही आणि जमतही नाही. त्यांना राजकारण सोडून काहीही कळतं नाही."