मुंबई - Aditi Rao Hydari-Siddharth Marriage: अभिनेत्री आदिती राव हैदरी आणि साऊथ अभिनेता सिद्धार्थ लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. या दोघांनी गुपचूप लग्न केल्याचा आता खुलासा झाला आहे. अचानक लग्न करून आदितीनं तिच्या चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. इन्स्टाग्रामवर तिनं पती सिद्धार्थबरोबर काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये तिनं एक सुंदर संदेश तिच्या पतीसाठी लिहिला आहे. दरम्यान दोघांनी वानपर्थीच्या 400 वर्षे जुन्या मंदिरात लग्न केलं आहे. फोटो शेअर करत आदितीनं लिहिलं, 'तू माझा सूर्य, माझा चंद्र आणि माझे सर्व तारे आहेस... नेहमीसाठी माझा पिक्सी सोलमेट राहा...मिसेस आणि मिस्टर अदु-सिद्धू,'
आदिती राव हैदरीनं शेअर केले लग्नाचे फोटो : आदितीनं शेअर केलेले फोटोग्राफ्स खूप आकर्षक आहेत. तिनं आणि सिद्धार्थनं वानपर्थीच्या 400 वर्ष जुन्या मंदिरात लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. आदितीनं या मंदिराबाबत सांगितलं होतं की,"लग्न हे 400 वर्षे जुन्या वानपर्थी मंदिरात होणार आहे, जे माझ्या कुटुंबासाठी खूप महत्त्वाचे आहे." आता आदितीनं शेअर केलेल्या पोस्टवर अनेक चाहते या जोडप्यावर अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत. या पोस्टवर एका चाहत्यानं शुभेच्छा देत लिहिलं, 'जोडी खूप सुंदर आहे, खूप खूप अभिनंदन.' दुसऱ्या एकानं लिहिलं, 'तुम्ही दोघेही एकत्र खूप सुंदर दिसता.' आणखी एकानं लिहिलं, 'अभिनंदन एकत्र राहा.' याशिवाय अनेकजण हार्ट आणि फायर इमोजी या पोस्टवर शेअर करत आहेत. तसेच सेलिब्रिटींनी कमेंट सेक्शनमध्ये नवविवाहित जोडप्याला शुभेच्छा दिल्या आहेत.