मुंबई - Aditi Rao Hydari and Siddharth :साऊथ अभिनेता सिद्धार्थ आणि अभिनेत्री अदिती राव हैदरी यांच्याबद्दल कालच्या बातम्यांमध्ये असे बोलले जात होते की या जोडप्यानं तेलंगणातील एका मंदिरात जाऊन गुपचूप लग्न केलं. मात्र आज सिद्धार्थ आणि अदिती राव हैदरी यांनी सोशल मीडियावर एंगेजमेंट रिंग्जबरोबचा फोटो शेअर करून सर्वांना सुखद धक्का दिला आहे. हा फोटो शेअर करत सिद्धार्थनं लिहिलं आहे की, "ती हो म्हणाली आणि आम्ही एंगेज्ड झालो." याशिवाय अदितीनं फोटो शेअर करत लिहिलं, "तो हो म्हणाला आणि आम्ही एंगेज्ड झालो." आता या जोडप्याच्या पोस्टवर अनेकजण कमेंट्स करून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.
सिद्धार्थ आणि अदिती चाहत्यांनी दिल्या शुभेच्छा :एका चाहत्यांनं या पोस्ट कमेंट करत लिहिलं, "सिद्धार्थ तू कधी लग्न करणार आहेस?" दुसऱ्यानं लिहिलं, तुमच्या दोघांची जोडी हिट आहे अभिनंदन.'' आणखी एकानं लिहिलं, ''मी तुमच्यासाठी खूप खुश आहे.'' याशिवाय काहीजण या पोस्टवर हार्ट आणि फायर इमोजी पोस्ट करत आहेत. तसंच या पोस्टवर अभिनेत्री प्रियांका चोप्रा, गायिका सोफी चौधरी यांनी अभिनंदन लिहिलं आहे. याशिवाय आयुष्मान खुरानानं ब्लॅक हार्ट इमोजी शेअर केला आहे. सिद्धार्थ आणि अदितीच्या लग्नाची तारीख अजूनही समोर आली नाही. मात्र हे जोडपं लवकरच लग्न करतील असा सध्या अंदाज लावला जात आहे.