मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री नर्गिस फाखरी सध्या मोठ्या पडद्यापासून दूर असली तरी ती तिच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियाच्या माध्यामातून संपर्कात असते. बॉलिवूड चित्रपट आणि वेब सिरीजमध्ये अभिनय करणारी नर्गिस तिचा बहुतेक वेळ न्यू यॉर्कमधील तिच्या घरी घालवत असते. दरम्यान, सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे ज्यामध्ये असा दावा केला जात आहे की नर्गिस फाखरीनं लग्न केलंय. इतकंच नाही तर लग्नाचं सर्व फोटो रेडिट पोस्टमध्येही दिसत आहेत.
नर्गिस फाखरी रेडिट पोस्ट (Nargis Fakhri reddit post) बॉलिवूड अभिनेत्री नर्गिस फाखरीच्या लग्नाशी संबंधित एक रेडिट पोस्ट सध्या व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये, अभिनेत्री नर्गिसच्या गुप्त लग्नाचे काही खास फोटो दिसत आहेत. माध्यामामध्ये सुरू असलेल्या चर्चेवरुन दिसतंय की नर्गिसनं तिचा जुना प्रियकर टोनी बेगशी लग्न केलंय. हे लग्न अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये झालं आहे. या लग्नाच्यावेळी तिच्या जवळचे मित्र आणि कुटुंबातील सदस्य सहभागी झाले होते.
नर्गिस फाखरी इंस्टाग्राम स्टोरी ((Instagram)) व्हायरल झालेल्या फोटोमध्ये, एका मोठ्या १० मजली केकवर 'हॅपी मॅरिड लाइफ' असं लिहिलेलं आहे. या केकवर टी.बी. आणि एन.एफ.. लिहिलं आहे. दुसऱ्या फोटोमध्ये, नर्गिस आणि टोनीच्या नावाचे पहिले दोन आद्याक्षरं लिहिलेली आहेत. तिसऱ्या फोटोमध्ये नर्गिसचा फोटो दिसतोय.
नर्गिस फाखरी रेडिट पोस्ट (Nargis Fakhri reddit post) फोटोत नर्गिसच्या हातामध्ये तिनं गुप्तपणे केलेल्या लग्नाची एक अंगठी दिसत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या जोडप्यानं त्यांच्या लग्नात येणाऱ्या पाहुण्यांना फोटो न घेण्याची विनंती केली होती.
नवविवाहित जोडपं घेतंय हनिमूनचा आनंद - नर्गिस फाखरीनं तिच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर स्वित्झर्लंडमधील अनेक फोटो पोस्ट केले आहेत. तिनं टोनीची पोस्ट पुन्हा पोस्ट केली ज्यात ते दोघे क्वालिटी टाईम घालवताना दिसत आहेत. या फोटोमध्ये दोघेही कॅमेऱ्यासमोर पोज देताना दिसत आहेत. शेवटच्या क्लिपमध्ये, नर्गिस स्वित्झर्लंडमध्ये रेल्वेचा आनंद घेताना दिसत आहे. आतापर्यंत, नर्गिस आणि टोनी यांनी त्यांच्या लग्नाची अधिकृत घोषणा केलेली नाही.
कोण आहे नर्गिस फाखरीचा नवरा टोनी बेग? - टोनी बेग हा काश्मीरचा रहिवासी आहे. टोनी बेगच्या वडिलांचे नाव शकील अहमद बेग आहे. सध्या टोनी अमेरिकेत राहतो. ते २००६ मध्ये सुरू झालेल्या डायोज ग्रुपचे संस्थापक आहे. तेव्हापासून त्यानं व्यवसाय जगात स्वतःसाठी एक खास स्थान निर्माण केलं आहे. त्याच्याकडे अॅलानिक, ओएसिस, ८ हेल्थ, ८ ईव्ही आणि १ एनर्जी असे अनेक ब्रँड आहेत जे डायओस ग्रुप अंतर्गत येतात. त्यांच्या कंपनीचे मुख्यालय लॉस एंजेलिसमध्ये आहे. याशिवाय, त्यांची मुख्यालये लंडन, दुबई, रियाध, सिडनी, ढाका, शांघाय आणि कोलकाता अशा जगाच्या विविध भागात आहेत.
नर्गिस फाखरी रेडिट पोस्ट (Nargis Fakhri reddit post) टोनी बेग नर्गिसपेक्षा लहान आहे- नर्गिस फाखरी हिचा जन्म २० ऑक्टोबर १९७९ रोजी न्यू यॉर्कमधील क्वीन्स सिटी येथे झाला. २०२५ मध्ये ती ४५ वर्षांची आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, टोनी बेगचा जन्म १९८४ मध्ये काश्मीरमध्ये झाला आहे आणि तो नर्गिसपेक्षा साधारण ५ वर्षांनी लहान आहे.
नर्गिस फाखरी रेडिट पोस्ट (Nargis Fakhri reddit post) हेही वाचा -