मुंबई : 'पवित्र रिश्ता' फेम अभिनेत्री अंकिता लोखंडेनं 19 डिसेंबर रोजी तिचा वाढदिवस साजरा केला. अंकितानं आपला वाढदिवस पती विकी, दिर आणि जाऊबाईबरोबर साजरा केला. आता विकी जैननं त्याच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये विकी जैन पत्नी अंकिता लोखंडेबरोबर वाढदिवसाचे सेलिब्रेशन करताना दिसत आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला दोन छोटे मुले आनंदी असल्याचे दिसतात. यानंतर अंकिता ही पती विकीबरोबर हॉलमध्ये येते. ब्लॅक ट्रॅक सूट आणि ब्लू डेनिम जॅकेट घातलेली अंकिता यावेळी एकदम स्टाईलिश लूकमध्ये दिसते. हॉलमध्ये प्रवेश करताच सजावट पाहून अंकिता आनंदी होते. यानंतर ती तिच्या जाऊबाईला मीठी मारते.
अंकिता लोखंडेचा वाढदिवस :यानंतर ती दिराच्या पायाला स्पर्श करून आशीर्वाद घेते आणि केक कट करून आपला आनंद व्यक्त करताना दिसते. अंकिताच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचा व्हिडिओ पोस्ट करताना विकीनं त्याच्या लेडी लव्हसाठी यावर सुंदर असं कॅप्शन दिलं आहे. यामध्ये त्यानं लिहिलं, 'खरोखर एक खास दिवस. ते म्हणतात की प्रेम ही जगातील सर्वात सुंदर भावना आहे, मी याला जास्त सहमत नाही. माझ्या जिवलग मैत्रीण माझ्या आयुष्याची जोडीदार झाल्यानंतर सर्व काही चांगले झाले आहे! विकीनं पुढं लिहिलं, 'मंकू, तू आमच्याबरोबर असते, तेव्हा घर हे, घर असते. तू असते तर सब बेस्ट वाटते. आज, या विशेष दिवशी, माझ्याकडे फक्त प्रेमाशिवाय काहीही नाही! वाढदिवसाच्या शुभेच्छा, माझ्या प्रिये!' तुला सर्वांचे प्रेम मिळो आणि बाप्पा सर्व बेस्ट करेल.'