महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीकडून टीव्ही अभिनेता करण वाहीसह क्रिस्टल डिसूजा यांची चौकशी, नेमके कारण काय? - Karan Wahi and Krystle D Souza - KARAN WAHI AND KRYSTLE D SOUZA

Karan Wahi and Krystle D'Souza : अभिनेता करण वाही आणि क्रिस्टल डिसूजाची मनी लाँड्रिंगप्रकरणी ईडीकडून चौकशी करण्यात आली आहे. आता हे दोन्ही स्टार ईडीच्या रडारवर आहेत.

Karan Wahi and Krystle D Souza
करण वाही आणि क्रिस्टल डिसूजा (Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 4, 2024, 12:38 PM IST

मुंबई - Karan Wahi and Krystle D'Souza : फॉरेक्स ट्रेडिंग ऑनलाइन प्लॅटफॉर्म ऑक्टा एफएक्स प्रकरणात ईडीनं टीव्ही कलाकार करण वाही आणि क्रिस्टल डिसूझा यांची कसून चौकशी केली. चौकशी केल्यानं अभिनेता करण वाही आणि क्रिस्टल डिसूजा अडचणीत सापडले आहेत. पीएमएलए (PMLA) (मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायदा, 2002) अंतर्गत त्यांचे जबाब नोंदवले गेले आहेत. तसेच निया शर्मालादेखील ईडीनं समन्स बजावला होता. मात्र, ती हजर राहिली नाही.

20 एप्रिल रोजी, ईडीनं मुंबई, चेन्नई, कोलकाता आणि दिल्ली येथे अनेक ठिकाणी छापे टाकले. सुमारे 2.5 कोटी रुपयांची बँक रक्कम गोठविला. दरम्यान या प्रकरणाशी संबंधित डिजिटल पुरावे आणि कागदपत्रे जप्त केली. याआधी देखील करण वाही आणि क्रिस्टल डिसोझा यांनाही समन्स पाठवण्यात आले होते. यानंतर याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मनी लाँडरिंग केस :ईडीनं नंतर मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा, 2002 अंतर्गत तपास सुरू केला. आंतरराष्ट्रीय ऑक्टा एफएक्स ब्रोकर ट्रेडिंग ॲपद्वारे भारतात अवैध ऑनलाइन फॉरेक्स ट्रेडिंग होत असल्याचा आरोप आहे. यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून परवानगी घेण्यात आली नव्हती. त्यामुळे ईडीला ही चौकशी सुरू करावी लागली. बेकायदेशीर ऑनलाइन फॉरेक्स ट्रेडिंग ॲप ऑक्टा एफएक्स (OctaFx) आणि ऑक्टा एफएक्स डॉट कॉमशी (OctaFX.com) जोडलेल्या कथित मनी लाँड्रिंग प्रकरणाच्या संदर्भात अंमलबजावणी संचालनालयानं (ED) टीव्ही कलाकार क्रिस्टल डिसूझा आणि करण वाही यांचे जबाब नोंदवल्यानंतर हे कलाकार चर्चेत आले आहे. ईडीनं दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात डिसूझा आणि वाही यांचे साक्षीदार म्हणून जबाब नोंदवण्यात आले आहेत.


ईडीनं घेतली झडती : ईडीच्या झडतीदरम्यान विविध गुन्ह्यासंदर्भात कागदपत्रे आणि डिजिटल उपकरणे जप्त केली गेली. या घोटाळ्याचा ईडीचा मनी लाँड्रिंग तपास पुण्याच्या शिवाजी नगर पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या एफआयआरवर आधारित आहे. ऑक्टा एफएक्स (OctaFx) ट्रेडिंग प्लॅटफॉर्मद्वारे फॉरेक्स ट्रेडिंगच्या बहाण्यानं लोकांना उच्च परतावा देण्याचे आमिष दाखवून त्यांची फसवणूक केल्याबद्दल अनेक लोकांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आली आहे.

हेही वाचा :

  1. सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बालनं हनीमूनमधील केले सुंदर क्षण चाहत्यांबरोबर शेअर - Sonakshi sinha and zaheer iqbal
  2. सिद्धार्थ मल्होत्राच्या चाहतीला 50 लाखाचा झटका, कियारा अडवाणीमुळे अभिनेत्याचा जीव धोक्यात - Sidharth Malhotra
  3. विराट कोहलीनं व्हिडिओ कॉल करून अनुष्का शर्माला हरिकेन बेरीलची दाखवली झलक - virat showed anushka hurricane

ABOUT THE AUTHOR

...view details