मुंबई Shah Rukh khan Rana Daggubati : अभिनेता शाहरुख खान बऱ्याच दिवसांपासून आयफामध्ये दिसला नव्हता, मात्र यावेळी त्याची जादू पुन्हा एकदा त्याच्या चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. 10 सप्टेंबर रोजी मुंबईत 24 व्या आयफा पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यावेळी शाहरुख खान आयफा 2024 (IIFA) होस्ट करणार आहे. यासाठी एक पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली, यामध्ये किंग खान, करण जोहर, अभिषेक बॅनर्जी, राणा दग्गुबती आणि सिद्धांत चतुर्वेदी, यांसारखे अनेक स्टार्स उपस्थित होते. या कार्यक्रमात सर्व स्टार्स हसताना आणि विनोद करताना दिसले.
शाहरुख खाननं सांगितलं नव्या पिढीबद्दल : या कार्यक्रमात शाहरुखचा सेन्स ऑफ ह्युमर पुन्हा स्टेजवर पाहायला मिळाला. यावेळी 'किंग खान'नं आजच्या नव्या पिढीची मजेशीरपणे खिल्ली उडवली, हे ऐकल्यानंतर राणा दग्गुबतीला त्याच्या पायला स्पर्श करुन आशीर्वाद घ्यावा लागला. या कार्यक्रमात सिद्धांत आणि अभिषेक हे 'किंग खान'च्या पायांना स्पर्श करतात. यानंतर शाहरुख नवीन पिढीची खिल्ली उडवतो. नव्या पिढीबद्दल बोलताना शाहरुखनं म्हटलं, "नवीन पिढी ही स्वत:च्या पाया पडते. जुन्या पिढीमधील मुलं आदर देखील करतात, पण वेगळ्या प्रकारे करतात. (शाहरुख हा करणच्या पायाला स्पर्श करतो. यानंतर तो स्वत:च्या पायाला हातानं स्पर्श करतो.) या गोष्टीवर तिथे उपस्थित असलेले लोक सर्व हसतात.