महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

'वॉर 2' च्या शूटिंगला होणार सुरुवात, हृतिक रोशनने दिली अपडेट - वॉर 2 शूटिंग

War 2 going on floors : हृतिक रोशन आणि ज्युनियर एनटीआर लवकरच बहुप्रतिक्षित वॉर 2 च्या शूटिंगला सुरुवात करणार आहेत. हा चित्रपट हृतिक आणि टायगर श्रॉफ अभिनीत वॉर या हिट चित्रपटाचा सिक्वेल आहे.

Hrithik Roshan
हृतिक रोशन

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 30, 2024, 3:09 PM IST

मुंबई- War 2 going on floors :बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनचा फायटर हा एरियल अ‍ॅक्शन चित्रपट अलिकडेच रिलीज झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांनी सर्वत्र उत्तम प्रतिसाद दिला. यापुढे हृतिक त्याच्या स्पाय अ‍ॅक्शन फिल्म वॉरच्या सिक्वेलमध्ये दिसणार आहे. या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. हृतिक रोशन आणि एनटीआर ज्युनियर अभिनीत स्पाय-अ‍ॅक्शन थ्रिलर वॉर 2 च्या निर्मितीची घोषणा झाल्यापासून प्रेक्षक रिलीजची वाट पाहत आहेत.

या चित्रपटात तेलुगू सुपरस्टार ज्युनियर एनटीआर देखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये वेगळा उत्साह पाहायला मिळतो. या चित्रपटाबद्दल नवीन अपडेट शेअर करताना हृतिकने अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीत चित्रपटाचे शूटिंग कधी सुरू होणार याविषयी सांगितले. 'वॉर 2' बद्दल अधिक तपशील सांगण्यास नकार देत हृतिकने या चित्रपटाची निर्मिती लवकरच सुरू होईल, असे सांगितले.

मुलाखतीदरम्यान, हृतिकने वॉर 2 मधील त्याच्या व्यक्तिरेखेबद्दल चर्चा करताना सांगितले की, "कबीरने निश्चितपणे एक छाप सोडली आहे. पुन्हा एकदा ही व्यक्तीरेखा साकारणे यावेळेस आनंददायक असेल. कबीरला नवीन पद्धतीने चित्रित करणे हे माझ्यासाठी आव्हानात्मक आहे. त्याची दुसरी बाजू खूपच रंजक असणार आहे."

हृतिक रोशन, ज्युनियर एनटीआर आणि कियारा अडवाणी यांच्या प्रमुख भूमिका असलेला वॉर 2 हा चित्रपट २०२५ च्या स्वातंत्र्यदिनी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. यशराज फिल्म्सने अलीकडेच सलमान खान-कतरिना कैफ यांच्या भूमिका असलेल्या टायगर चित्रपटामधील पोस्ट-क्रेडिट सीनमध्ये हृतिकच्या व्यक्तिरेखेची झलक दाखवली होती.यामुळे वॉरच्या सिक्वेलची उत्सुकता वाढली आहे. वॉर 2 हा ज्युनियर एनटीआर आणि हृतिकचा पहिलाच एकत्रित चित्रपट आहे.

'वॉर 2' हा चित्रपट 2019 च्या अ‍ॅक्शन थ्रिलर 'वॉर'चा सिक्वेल आहे. या चित्रपटामध्ये हृतिक रोशन, टायगर श्रॉफ आणि वाणी कपूर यांनी भूमिका केल्या होत्या. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित या हाय-ऑक्टेन अ‍ॅक्शन चित्रपटाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर पहिल्या सात दिवसात 200 कोटींचा गल्ला जमा केला होता. तो वर्षातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या हिंदी चित्रपटांपैकी एक ठरला होता.

हेही वाचा -

  1. पाकिस्तानी गायक बिलाल सईदची सटकली, प्रेक्षकांवर भिरकवला माईक!
  2. "प्रेक्षकांनी त्यांच्या हृदयात स्थान दिले", शाहरुख खानचे प्रतिपादन
  3. महात्मा गांधी पुण्यतिथीनिमित्त त्यांच्यावर आधारित 'हे' 5 चित्रपट आवर्जून पाहा

ABOUT THE AUTHOR

...view details