महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

56 लाख फॉलोअर्स, तरीही NOTA पेक्षा पडली कमी मतं, लोकांनी उडवली एजाज खानची खिल्ली - AJAZ KHAN ELECTION RESULT

बिग बॉसचा स्पर्धक राहिलेल्या एजाज खाननं महाराष्ट्राच्या निवडणुकीत नशीब आजमावले होते. मात्र त्याला पडलेली मतं नोटाला मिळालेल्या मतापेक्षाही कमी आहेत.

Ajaz Khan
एजाज खान (( IANS))

By ETV Bharat Entertainment Team

Published : Nov 23, 2024, 6:17 PM IST

मुंबई - महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची 2024 ची मतमोजणीतून महाराष्ट्रात महायुतीचं सरकार स्थापन होणार हे स्पष्ट झालंय. मुंबईतील वसोर्वा विधानसभा मतदारसंघ हा महाराष्ट्रात चर्चेचा विषय राहिला आहे. बिग बॉसचा माजी स्पर्धक, अभिनेता आणि स्वत:ला मुंबईचा भाईजान म्हणवणाऱ्या अजान खाननेही या जागेवर निवडणूक लढवली होती. एजाज यांनी खासदार चंद्रशेखर आझाद यांच्या आझाद समाज पक्षातर्फे निवडणूक लढवली होती. मात्र, एजाज खान यांना इतकी कमी मतं मिळाली आहेत की त्याच्यावर आता चोहीबाजूंनी टीका होत आहे. एजाजचे सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स आहेत, तरीही त्याला त्याचा कोणताही फायदा झाला नाही.

एजाजचे सोशल मीडियावर 5 दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स

एजाज खानला फेसबुकवर ४.१ दशलक्ष आणि इंस्टाग्रामवर ५.६ दशलक्ष चाहते फॉलो करतात. असे असूनही मतमोजणीच्या 18 फेऱ्यांनंतर त्याला केवळ 146 मतं मिळाली. त्याला मिळालेल्या या मतदार संघातील हा मतांचा हा आकडा NOTA पेक्षा खूपच कमी आहे. याठिकाणी तर 1216 लोकांनी NOTA वर बटण दाबले आहे. NOTA ला पडलेल्या मतांएवढीही मत त्याला मिळू न शकल्यानं नेटिझन्सनी त्याची खिल्ली उडवली आहे.

एजाजनं कॅरी मिनातीलाही केलं होतं लज्जित

अभिनेता एजाज खाननं चंद्रशेखर आझाद यांच्या आझाद समाज पार्टीकडून निवडणूकलढवली होती. यासाठी त्याला किटली हे निवडणूक चिन्ह मिळालं होतं. त्यानं मतदार संघात फिरुन, सभा घेऊन आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचार केला होता. त्यानं मतदान करण्यासाठी व्हिडिओही बनवले होते. मात्र मतदारांनी त्याला सपशेल नाकारलं आहे.

बिग बॉस 7 चा भाग असलेला एजाज खान एक निडर आणि मनमिळावू अभिनेता म्हणून ओळखला जातो. जगातील लोकप्रिय यूट्यूबर्सपैकी एक असलेल्या भारताच्या कॅरी मिनातीने देखील त्याच्या व्हिडिओमध्ये त्याला रोस्ट केलं होते. त्यानंतर जेव्हा कॅरी त्याला भेटला तेव्हा त्याला पकडून आणि त्याच्या चेहऱ्यावरील मास्क काढून त्याला माफी मागायला एजाजनं भाग पाडलं होतं. आपल्यावर कॅरीनं केलेला व्हिडिओ आवडला नाही म्हणून आक्रमक झालेला एजाज त्यावेळी त्याला म्हणाला होता की, उंदीर पकडण्यासाठी कुठल्याही बिळात हात घालत जाऊ नकोस, कारण काही बिळात सापही असू शकतात.

ABOUT THE AUTHOR

...view details