मुंबई -साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुनचा आगामी चित्रपट 'पुष्पा 2 - द रुल'च्या रिलीजची प्रतीक्षा जोरदारपणे सुरू आहे. साऊथ सुपरस्टार अल्लु अर्जुनचे चाहते 'पुष्पा 2- द रुल'च्या रिलीजची आतुरतेने वाट पाहत असून आता या चित्रपटाची दोन गाणी रिलीज झाली आहेत. त्यामुळे चाहत्यांची अस्वस्थता आणखीनच वाढली आहे. आता 'पुष्पा 2 - द रुल'बाबत एक धक्कादायक अपडेट समोर येत आहे. 'पुष्पा 2 - द रुल' रिलीज होण्याआधीच एका महत्वाच्या तंत्रज्ञानं चित्रपटापासून दूर जाण्याचा निर्णय घेतला आहे.
'पुष्पा 2 द रुल' कोणी सोडला?
सुकुमार दिग्दर्शित 'पुष्पा 2 द रुल' हा चित्रपट बनवत आहेत आणि त्यासाठी 300 कोटी रुपये खर्च आला आहे. 'पुष्पा 2 -द रुल' हा एक अॅक्शन पॅक्ड ड्रामा चित्रपट आहे. या चित्रपटाचं जगभरात प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट 15 ऑगस्ट 2024 रोजी प्रदर्शित होणार असल्याचं निश्चित झालंय. त्यापूर्वी चित्रपटाचे संकलक कार्तिक श्रीनिवास यांनी चित्रपट अर्धवट सोडला आहे. कार्तिक अनेक वर्षांपासून दिग्दर्शक सुकुमारसाठी काम करत आहे आणि आता क्रिएटिव्ह मतभेदांमुळे कार्तिकनं चित्रपट सोडला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार कार्तिकच्या जागी नवीन नूली यांना 'पुष्पा 2- द रुल' या चित्रपटाचे संकलक म्हणून आणण्यात आलं आहे. ज्यांनी अनेक मोठ्या चित्रपटांच्या संकलनाचं काम केलं आहे. 'पुष्पा 2 -द रुल' चित्रपटातील दुसरे गाणे 'अंगारों' रिलीज झालं याचं संकलनाचं काम नवीन नूली यांनी केलं आहे. नव्या पोस्टरच्या डिझाईनमध्येही त्यांचं श्रेय आहे.