मुंबई - Rishi Kapoor Death Anniversary : आज, 30 एप्रिल रोजी हिंदी चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट अभिनेता ऋषी कपूर यांची चौथी पुण्यतिथी आहे. यानिमित्तानं त्यांचे कुटुंबीय, चाहते आणि सेलेब्स त्यांचे स्मरण करत त्यांना श्रद्धांजली अर्पण करत आहेत. दरम्यान नीतू कपूर यांनी दिवंगत पती ऋषी कपूरबरोबरचा सुंदर फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ऋषी आणि नीतू एकत्र खूप खास दिसत आहे. हा फोटो शेअर करत नीतू यांनी पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलं, "4 वर्षे झाली, पण तुझ्याशिवाय हे आयुष्य पूर्वीसारखे नाही." ऋषी कपूर यांचं 2020 मध्ये मुंबईतील एच.एन. रिलायन्स हॉस्पिटलमध्ये ल्युकेमिया कॅन्सरमुळे मृत्यू झाला. 2 वर्षांपासून ते या आजाराशी झुंज देत होते. ल्युकेमियाशी दोन वर्षांच्या लढाईनंतर त्यांनी 67 व्या वर्षी अखेर जगातून निरोप घेतला.
राकेश रोशन शेअर केला जुना फोटो : ऋषी कपूर यांचे कोरोनाच्या काळात निधन झाले होते. दरम्यान ऋषीच्या पुण्यतिथीनिमित्त मित्र राकेश रोशननं एक जुना फोटो शेअर केला आहे. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलं, "चिंटू तू नेहमी आमच्याबरोबर असतो." राकेश आणि ऋषी यांनी 'खेल खेल में' (1975) आणि 'आप के दिवाने' (1980) यांसारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं होतं. या दोघांची मैत्री चार दशकांहून अधिक काळ होती. दरम्यान, ऋषी कपूर यांच्यावर न्यूयॉर्कमध्ये इलाज सुरू होता. त्याच्यावर सप्टेंबर 2018 मध्ये ल्युकेमियासाठी उपचार करण्यात आला होता.