महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

साऊथच्या 4 सिनेमांनी उघडलं '100' कोटीनं खातं, 'पुष्पा'ची जगभरातील कमाई 294 कोटी...अल्लू अर्जूनचा विक्रम कोण मोडणार? - ALLU ARJUN BIGGEST HIT FILMS

पहिल्या दिवशी 100 कोटींची कमाई करण्याचा विक्रम आजवर फक्त साऊथच्या चार सिनेमांच्या नावावरच आहे. बॉलिवूडलाही हे अद्याप जमलेलं नाही.

Allu Arjun's record
अल्लू अर्जूनचा विक्रम (Movie posters)

By ETV Bharat Entertainment Team

Published : Dec 6, 2024, 5:28 PM IST

Updated : Dec 6, 2024, 6:48 PM IST

मुंबई - 'पुष्पा 2 द रुल' या चित्रपटासह अल्लू अर्जुननं भारतीय चित्रपट उद्योगाला इशारा दिला आहे की 'पुष्पा' कोणत्याही परिस्थितीत झुकणार नाही. त्याच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'पुष्पा' चित्रपटानं हे खरं करुन दाखवलं आहे. 5 डिसेंबर रोजी जगभरात प्रदर्शित झालेल्या या चित्रपटानं भारतात पहिल्याच दिवशी 175 कोटी रुपयांसह आपलं खातं उघडले आणि भारतीय चित्रपट उद्योगातील सर्व चित्रपटांना पिछाडीवर सोडलं. 'पुष्पा 2 द रुल 'हा देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 100 कोटींहून अधिक कमाई करून आपले खाते उघडणारा चौथा भारतीय चित्रपट ठरला आहे. विशेष म्हणजे जगभर 'पुष्पा 2 द रुल ' या चित्रपटानं तब्बल 294 कोटींचं कल्केशन करुन नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.

आता अल्लू अर्जुन आणि 'पुष्पा 2 द रुल' भारतीय बॉक्स ऑफिसवर राज्य करत आहेत. 'पुष्पा 2 द रुल'सह भारतात आजवर फक्त 4 चित्रपट आहेत, ज्यांनी देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 100 कोटींची ओपनिंग केली आहे. परंतु आश्चर्याची गोष्ट म्हणजे भारतीय चित्रपटावर राज्य करणारा बॉलिवूड स्टार शाहरुख खान सलमान खान, आमिर खान आणि अक्षय कुमार यांसारख्या स्टार्सचा एकही चित्रपट या यादीत नाही.

भारतात १०० कोटीसह सुरुवात करणारे चित्रपट

भारतीय बॉक्स ऑफिसवर पहिला चित्रपट म्हणजे प्रभास स्टारर चित्रपट 'बाहुबली 2 - द कन्क्लूजन' (2017) या दक्षिण चित्रपट उद्योगाचे दिग्गज दिग्दर्शक एस.एस. राजामौली दिग्दर्शित केलेल्या चित्रपटानं पहिल्या दिवशी जगभरात 217 कोटी रुपये आणि भारतात 121 कोटी रुपयांची कमाई केली होती. या विक्रमालाही अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2 द रुल 'नं मागं टाकत तब्बल 294 कोटींची कमाई केली आहे. बाहुबली 2' नं एकूण 1800 कोटींची कमाई केली होती. यानंतर 2022 मध्ये रिलीज झालेल्या राम चरण आणि ज्युनियर एनटीआरच्या जोडीच्या 'आरआरआर' चित्रपटानं धमाका केला. बॉक्स ऑफिसवर राजामौलीच्या या चित्रपटानं नवा विक्रम केला होता.

देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 100 कोटींची कमाई करणारा आरआरआर हा दुसरा चित्रपट ठरला होता. या चित्रपटानं 'बाहुबली'चा विक्रम मोडीत काढला होता. 'आरआरआर' चित्रपटानं जगभरात 1200 कोटी रुपयांपेक्षा जास्त कलेक्शन केलं होतं. 'आरआरआर' नंतर कन्नड सुपरस्टार यशचा मेगा-ब्लॉकबस्टर चित्रपट 'केजीएफ' ( KGF 2) पुढील महिन्यात एप्रिल 2022 मध्ये प्रदर्शित झाला आणि बॉक्स ऑफिसवर हादरले. प्रशांत नील दिग्दर्शित 'केजीएफ 2' नं देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 116 कोटी रुपयांचं खातं उघडले. 'केजीएफ 2' नं देखील 1200 कोटींहून अधिक कमाई केली आहे.

आता, अल्लू अर्जुन स्टारर 'पुष्पा 2 द रुल' या ऍक्शन चित्रपटानं देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर मोठी ओपनिंग यशस्वी केली आहे. अहवालांनुसार 'पुष्पा 2' नं देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 160 ते 175 कोटी रुपयांचं खातं उघडलं आहे. 'पुष्पा 2' ही भारताची आणि अल्लू अर्जुनच्या कारकिर्दीची सर्वात मोठी सलामीवीर फिल्म ठरली आहे. आता 'पुष्पा 2' चा रेकॉर्ड तोडण्यासाठी कोण पुढे येणार हे पाहायचं आहे.

1. बाहुबली - 121 कोटी रुपये

2. आरआरआर 133 कोटी.

3. केजीएफ ( KGF 2) 116 कोटी

या चित्रपटांनी आजपर्यंत 100 कोटींची ओपनिंग केली होती. आता यामध्ये 'पुष्पा 2' ची भर पडली आहे.

चालू वर्षात प्रदर्शित झालेल्या प्रभास स्टारर चित्रपट 'कल्की 2898 AD' या चित्रपटानं जगभरात 180 कोटी रुपयांचं खातं उघडलं होतं, परंतु देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 100 कोटींची कमाई करण्यापासून हा चित्रपट चुकला. 'कल्की'नं देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 95.30 कोटी रुपयांचं खातं उघडलं होतं. 2023 च्या अखेरीस प्रदर्शित झालेल्या प्रभासचा 'सालार पार्ट 1 - सीझफायर' या आणखी एक मास ड्रामा चित्रपटानं देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 90.70 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

'पुष्पा 2' चा रेकॉर्ड कोण मोडणार?

2025 मध्ये मोठ्या सुपरस्टार्सचे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. यामध्ये राम चरणचा 'गेम चेंजर', सलमान खानचा 'सिकंदर', प्रभासचा 'आत्मा' आणि 'राजा साहेब' यांच्यासह यश स्टारर 'टॉक्सिक' हे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. या सुपरस्टार्सचे हे चित्रपट 'पुष्पा २' चा विक्रम मोडू शकतील का यासाठी वाट पाहावी लागणार आहे.

Last Updated : Dec 6, 2024, 6:48 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details