नवी दिल्ली Unemployment In Indian Youth : देशात बोरोजगारी वाढल्याचा आरोप विरोधक वारंवार करत आहेत. मात्र रिझर्व्ह बँकेच्या सदस्या आशिमा गोयल यांनी भारतातील बेरोजगारी संदर्भात महत्वाची माहिती दिली आहे. भारतीय तरुणात बेरोजगारी सर्वाधिक आहे. मात्र ही बेरोजगारी क्षणिक आहे, अशी माहिती रिझर्व्ह बँकेच्या पॉलिसी कमिटी सदस्या आशिमा गोयल यांनी वृत्तसंस्थेला बोलताना दिली. "भारतीय तरुण कौशल्यं आत्मसात करण्यासाठी आणि उद्योजकतेत हात आजमावण्यासाठी अधिक वेळ घालवतात," असंही त्यांनी यावेळी सांगितलं.
भारतीय तरुणातील बेरोजगारी क्षणिक :भारतीय तरुणात बेरोजगारी जास्त आहे, मात्र ही बेरोजगारी क्षणिक आहे. भारतीय तरुण कौशल्य विकसित करण्यासाठी अधिक वेळ घालवतात. त्यामुळे त्यांना बेरोजगारीला तोंड द्यावं लागते, असं भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पॉलिसी कमिटी सदस्या आशिमा गोयल यांनी स्पष्ट केलं. देशातील रोजगार वाढीत सध्या अर्थव्यवस्थेच्या मजबूत वाढीमुळे सुधारणा होत आहे. मात्र तरुणांना जास्त वेतनही मिळत आहे, असंही आशिमा गोयल यांनी यावेळी स्पष्ट केलं.
देशातील बेरोजगारीत तब्बल 83 टक्के तरुण :तरुणांमधील बेरोजगारी सर्वाधिक आहे, मात्र ती क्षणिक असते. देशातील तरुण कौशल्य विकसित करण्यासाठी अधिक वेळ घेतात, मात्र त्यानंतर ते उद्योग व्यवसायात चांगलं काम करतात, असंही आशिमा गोयल यांनी यावेळी स्पष्ट केलं. त्या आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या (ILO) अहवालावरील प्रश्नाला उत्तर देत होत्या. देशाच्या एकूण बेरोजगार लोकसंख्येमध्ये बेरोजगार तरुणांचा वाटा जवळपास 83 टक्के आहे. मात्र अलिकडील काळात तरुणांची बेरोजगारी मोठ्या प्रमाणात कमी होत आहे.
तरुणांच्या बेरोजगारीत कमालीची घट :अलीकडील काळात तरुणांची बेरोजगारी कमी होत आहे, असं आयएलओच्या अहवालात दिसून आलं, याकडं आशिमा गोयल यांनी लक्ष वेधलं. 2019 मध्ये बेरोजगारीचं प्रमाण 17.5 टक्के होतं. तर 2023 मध्ये हेच प्रमाण 10 टक्क्यांवर आलं. तरुणांची बेरोजगारी 2019 मध्ये 17.5 टक्के आणि 2023 मध्ये 10 टक्के होती. 2022 मध्ये 20 ते 24 या वयोगटातील बेरोजगारी सर्वात जास्त होती. यावेळी तरुणांच्या बेरोजगारीचं प्रमाण 16.9 टक्के होतं, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
हेही वाचा :
- देशात गेल्या 3 महिन्यात वाढली बेरोजगारी, धक्कादायक आकडेवारी काय सांगते?
- "हे बेरोजगारी अन् महागाईमुळे झालं", संसदेच्या सुरक्षेतील त्रुटींवरून राहुल गांधींची टीका
- Buldhana Protest : सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन; युवकांनी शिजवली बिरबलची खिचडी, उच्चशिक्षितांचा विदारक देखावा