नवी दिल्ली-केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज शुक्रवारी संसदेत आर्थिक सर्वेक्षण ( economical survey in union budget) अहवाल सादर करणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आर्थिक सर्वेक्षण अहवाल आज दुपारी १२ वाजता सादर केला जाणार आहे.
Live updates
- महाकुंभ मेळाव्यामधील चेंगराचेंगरीची दुर्घटना आणि पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या मृत्यूबाबात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. गरिबांना घरे देण्यासाठी सरकारनं खूप प्रयत्न केले आहेत. २ कोटी २५ लाख लोकांना त्यांच्या जमिनीचे अधिकार दिले आहेत. आयुष्यमान भारत अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना आरोग्य सेवा देण्यात येतात. ५०० खासगी कंपन्यांत रोजगाराच्या संधी दिल्या जात आहेत. पीएम योजनेचा करोडो लोकांना फायदा झाला आहे. एक राष्ट्र, एक निवडणुकीवर काम सुरू आहे. विकसित भारत घडविणं हे सरकारचं लक्ष्य आहे. २५ कोटी जनता दारिद्र्यरेषेच्या बाहेर आली आहे. तिसऱ्या कार्यकाळात तिप्पट वेगानं विकास होत आहे. भारत जगातील सर्वात मोठी तिसरी अर्थव्यवस्था होईल."
- पंतप्रधान मोदींनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होण्यापूर्वी महालक्ष्मीला वंदन केलं आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले, "गरीब, मध्यमवर्गीय परिवारावर महालक्ष्मीची कृपा असावी. देशाच्या जनतेनं तिसऱ्यांदा नेतृत्वाचा संधी दिली आहे. उद्या देशाचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. अर्थसंकल्पामधून नवीन विश्वास निर्माण होणार आहे. २०४७ मध्ये विकसित देशाचा भारताचा संकल्प आहे. स्वांत्र्याच्या १०० वर्षात भारत विकसित होणार आहे. भारत सध्या मिशन मोडमध्ये आहे. महिला वर्गासाठी अत्यंत आवश्यक निर्णय या अधिवेशनात होणार आहेत. अनेक ऐतिहासिक अधिवेशनावर चर्चा होणार आहे. रिफॉर्म, परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्म ही त्रिसुत्री आहे."
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (president murmu address parliament) आज सकाळी ११ वाजता संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित करणार आहेत. त्यांच्या भाषणानंतर, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण लोकसभा आणि राज्यसभेत आर्थिक सर्वेक्षण २०२४-२५ अहवाल स्वतंत्रपणे मांडणार आहेत. आर्थिक सर्वेक्षण अहवाल आज दुपारी सुमारे १२ वाजता लोकसभेत आणि दुपारी २ वाजता राज्यसभेत सादर केला जाणार आहे. हा आर्थिक सर्वेक्षण अहवाल मुख्य आर्थिक सल्लागार व्ही. अनंथा नागेश्वरन यांच्या देखरेखीखाली तयार करण्यात आलं आहे. त्यात अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागानं तयार केलेल्या अर्थव्यवस्थेची माहिती आणि सविस्तर आकडेवारी असते.