महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

जागतिक सर्प दिवस 2024 : किंग कोब्रा, मण्यार आणि घोणस सर्वाधिक घातक, देशभरात वर्षाला 10 हजार नागरिकांचा घेतात बळी - World Snake Day 2024

World Snake Day 2024 : भारतात दरवर्षी 10 हजार नागरिकांचा सर्पदंशानं बळी जातो. देशात 'बिग फोर' सापांनी दंश केल्यामुळे सर्वाधिक बळी जात असल्याचं उघड झालं आहे.

World Snake Day 2024
संपादित छायाचित्र (ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 16, 2024, 9:33 AM IST

हैदराबाद World Snake Day 2024 :देशभरात 16 जुलैला जागतिक सर्प दिन 2024 साजरा केला जातो. जगभरातील विविध प्रकारच्या सापांच्या प्रजातींबद्दल जागरुकता वाढवण्यासाठी या दिवशी जनजागृती करण्यात येते. भारतात सध्या 300 सापांच्या प्रजाती असल्याचं दिसून येते. जागतिक सर्प दिन पर्यावरणीय समतोल राखण्यात सापांच्या महत्त्वाच्या भूमिकेबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी साजरा करण्यात येतो. समाजात सापांच्याबद्दल नकारात्मक समज आहे. उंदरांची संख्या नियंत्रित करुन रोगांचा प्रसार रोखण्यासाठी साप आवश्यक आहेत. भारतात सुमारे जागतिक सर्प दिन 2024 हा सापांच्या संवर्धनाचं महत्त्व सांगण्यासाठी आणि गैरसमज दूर करण्यासाठी राबवण्यात येतो.

संपादित छायाचित्र (ETV Bharat)

देशात सर्पदंशानं दरवर्षी 10 हजारांहून अधिक होतात मृत्यू :एनसीआरबीच्या ( NCRB ) च्या आकडेवारीनुसार 2022 मध्ये सर्पदंशाच्या 10 हजार 0085 प्रकरणांची नोंद झाली. मात्र प्रत्यक्षात 10 हजार 0096 नागरिकांचा सर्पदंशानं मृत्यू झाला. मृत्यू झालेल्या संख्येत 6 हजार 490 पुरुष आणि 3 हजार 606 महिलांचा समावेश आहे. तर 31 जण नागरिक जखमी झाले. 2021 मध्ये 10 हजार 450 नागरिकांना साप चावला असून यात 10 हजार 382 नागरिकांचा मृत्यू झाला. मृत्यू झालेल्या नागरिकांमध्ये 6 हजार 432 पुरुष आणि 3 हजार 950 महिलांची संख्या आहेत. साप चावल्यानं मृत्यू होण्याच्या घटनात मध्यप्रदेश राज्य पहिल्या क्रमांकावर आहे. 2022 मध्ये मध्यप्रदेशात 2 हजार 487 मृत्यू झाले. तर दुसऱ्या स्थानावर ओडिशा राज्य असून ओडिशात 1 हजार 052 मृत्यू झाले. छत्तीसगड राज्य तिसऱ्या स्थानावर असून तिथं 869 मृत्यू झाले. महाराष्ट्रात तब्बल 771 मृत्यू झाले असून महाराष्ट्र चौथ्या स्थानावर आहे. तर राजस्थान 754 मृत्यूंसह पाचव्या स्थानावर आहे.

संपादित छायाचित्र (ETV Bharat)

बीग फोरमुळे होतात 90 टक्के मृत्यू :जागतिक आरोग्य संघटनेनं ( WHO ) जून 2017 मध्ये सर्पदंशाच्या विषाचा दुर्लक्षित उष्णकटिबंधीय रोगांच्या (NTDs) यादीत समावेश केला. राष्ट्रीय स्तरावरील मिलियन डेथ स्टडीनं 45 हजार 900 मृत्यू साप चावल्यानं होतात, अशी आकडेवारी दिली आहे. भारतात जवळपास 90 टक्के मृत्यू 'बिग फोर'मुळे होतात. या सापांमध्ये मण्यार ( कॉमन क्रेट ), इंडियन कोब्रा, घोणस ( रसेल वाइपर ) आणि सॉ स्केल्ड वाइपर यांचा समावेश होतो. शिक्षण आणि विषरोधी तरतुदीचा समावेश असलेलं प्रभावी औषध भारतातील सर्पदंशानं होणारे मृत्यू कमी करतील.

देशात अतिविषारी सापांचा आहे भरणा :भारत जैवविविधतेनं समृद्ध असलेला देश असून भारतात साप या विविधतेचा एक अविभाज्य भाग आहे. देशात सापांच्या 300 हून अधिक प्रजाती आढळत असून त्यापैकी 60 हून अधिक विषारी आहेत. जगतिक पातळीवरचे काही विषारी साप भारतात आढळतात. यात किंग कोब्रा, इंडियन क्रेट आणि घोणस ( रसेल वाइपर ) यांचा समावेश आहे. भारताला अनेकदा 'सापांचा देश' म्हणून ओळखलं जात असून देशात साप पकडण्याचा मोठा इतिहास आहे.

मजूर, पशुपालक आणि मच्छीमार पडतात सर्पदंशाला बळी :साप चावण्याच्या सगळ्यात मोठ्या घटना ग्रामीण भागात घडतात. यात मजूर, पशुपालक, मच्छीमार, कच्च्या घरात राहणारे नागरिक आदी बाधित होतात. दरम्यान सर्पदंशानं मृत्यूचं प्रमाण तरुणांमध्ये सर्वाधिक आहे. मात्र सर्पदंश झाल्यानंतर अँटीवनम घेण्याऐवजी पारंपरिक औषधं घेतल्यामुळे मृत्यूचा धोका वाढतो.

भारतातील टॉप 10 सर्वात विषारी साप

  • किंग कोब्रा
  • मण्यार ( इंडियन क्रेट )
  • घोणस ( रसेल वाइपर )
  • फुरसे ( सॉ-स्केल्ड वाइपर )
  • इंडियन कोब्रा
  • मालाबार पिट वाइपर
  • पट्टेरी मण्यार ( बैंडेड क्रेट )
  • बैम्बू पिट वाइपर
  • हंप-नोज्ड पिट वाइपर
  • अंडमान पिट वाइपर

हेही वाचा :

  1. साप झाला 'जानी दुश्मन!' 34 दिवसांत सहा वेळा केला दंश; नवव्यांदा होईल मृत्यू? - Snake Deadly Enemy
  2. विषारी साप शिजवून खाणारे बिहारचे प्रशासकीय अधिकारी; डॉक्टर काकांच्यामुळे केलं साप पकडण्याचं धाडस - Bihar Snake Eater
  3. पावसाळ्यात घरांमध्ये शिरलेल्या डझनभर विषारी-बिनविषारी सापांना जीवनदान, पाहा व्हिडिओ - Snakes in Thane

ABOUT THE AUTHOR

...view details