नवी दिल्ली :CAA Act : मोदी सरकारने आज सोमवार (दि. 11 मार्च)रोजी देशात नागरिकत्व दुरुस्ती कायदा (CAA) लागू करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. गृहमंत्रालयाकडून याबाबतची अधिसूचना आज जाही करण्यात आली आहे. दरम्यान, या कायद्याबाबदचा निर्णय पाच वर्षांपुर्वीच घेतला आहे. या कायद्याचा मसुदा संसदेत सादरही झालेला आहे. मात्र, आतापर्यंत अंमलबजावणीचा निर्णय झालेला नव्हता, तो आज झाला आहे.
दिले होते सुतोवाच : काही दिवसांपूर्वी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी कोणत्याही परिस्थितीत सीएए कायदा लागू होईल असं वक्तव्य केलं होतं. यामुळे, गेल्या काही दिवसांपासून लोकसभा निवडणुकीपूर्वी केंद्रातील मोदी सरकार देशात (CAA) लागू करणार अशा चर्चा सुरू होत्या. यानुसार आजपासून अर्थातच (दि. 11 मार्च 2024)पासून देशात नागरिकत्व दुरुस्ती कायदा लागू झाला आहे.
काय आहे CAA कायदा ? : सीएए कायद्यानुसार अर्थातच भारतीय नागरिकत्व दुरुस्ती कायदा लागू झाला आहे. यानुसार आता भारताशेजारी असलेल्या तीन मुस्लिम देशातील म्हणजे पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान येथील अल्पसंख्यांक नागरिकांना भारताचं नागरिकत्व बहाल केलं जाणार आहे. या तिन्ही देशांमधून विस्थापित झालेल्या अल्पसंख्यांक लोकांना भारताचं नागरिकत्व दिलं जाणार आहे.
पोर्टल सुरू झालं नाही : (दि. 31 डिसेंबर 2014) पर्यंत धार्मिक छळामुळे पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानमधून भारतात आलेल्यांसाठी हा कायदा करण्यात आला आहे. हा कायदा स्थलांतरित हिंदू, शीख, जैन, बौद्ध, पारशी आणि ख्रिश्चनांसाठी लागू आहे. यासाठी केंद्र सरकारने एक पोर्टल तयार केलेलं आहे. मात्र, अजून ते पोर्टल सुरू झालेले नाही.
नागरिकत्व मिळवणं सोपं : या पोर्टलची सुरुवात ज्यावेळी केंद्रीय गृह मंत्रालयाकडून CAA बाबत अधिसूचना जारी होईल त्यावेळी होऊ शकते. CAA कायदा आणि आधीचा भारतीय नागरिकत्व कायदा 1955 मध्ये काही फरक आहे. त्यामध्ये 1955 मध्ये भारतीय नागरिकत्व कायद्यात थोडेसे बदल झाले. या बदलामुळे नागरिकत्वासाठी अर्ज करणाऱ्या नागरिकांना कायदेशीररीत्या नागरिकत्व मिळवणं सोयीचं झालं आहे.
काय आहे कारण ?: या कायद्यात बदल करण्याचा उद्देश देखील हाच होता. पण, 1955 मध्ये सुधारित करण्यात आलेल्या भारतीय नागरिकत्व कायद्यात भारतात घुसखोरी करणाऱ्या नागरिकांना नागरिकत्त्व मिळू शकत नव्हतं. तसंच, त्यांना त्यांच्या मायदेशी परत पाठवण्याची किंवा प्रशासनाच्या ताब्यात देण्याबाबतही तरतूद करण्यात आलेली नव्हती. हेच कारण आहे की, 2014 मध्ये सत्तेत आलेल्या मोदी सरकारने 2019 मध्ये संसदेत CAA कायदा आणला.