Single Person On Valentine's Day : सिंगल राहण्याचे तसे अनेक फायदे आहेत. तुम्ही तुमचे छंद जोपासू शकता, स्वत:ला वेळ देऊ शकता. 'व्हॅलेंटाईन्स डे'च्या दिवशी तुम्ही तुमचे आवडते काम करु शकता. तुम्ही जर सिंगल असाल, तर निराश व्हायचं कारण नाही. कारण सिंगल असूनही 'व्हॅलेंटाईन्स डे' आनंदात साजरा करण्यासारखी दुसरी मज्जा नाही. चला तर मग जाणून घेऊ या या 7 गोष्टी, ज्याने तुमचा दिवस बनेल अविस्मरणीय.
- मित्रांबरोबर करा मजा : तुमचे काही मित्र 'व्हॅलेंटाईन्स डे'च्या निमित्तानं व्यस्त असू शकतात. अशावेळी तुम्ही स्वत:ला एकटे समजू नका. तुम्ही तुमच्या सर्व सिंगल मित्रांना एकत्र करा आणि त्यांच्यासोबत हा दिवस साजरा करा. अशावेळी तुम्ही तुमच्या मित्रासोबत एकत्र जेवण करु शकता. तसेच तुम्ही कुठेतरी एकत्र फिरायला जाऊ शकता.
- कुटुंबासह फिरायला जा : तुम्ही तुमच्या कुटुंबासमवेत हा दिवस साजरा करु शकता. याकरिता तुम्ही तुमच्या घरातील मंडळींना पिकनिकला घेऊन जा. जर तुम्हाला पिकनिकला जाणं शक्य नसेल तर तुम्ही त्यांना देवळात घेऊन जाऊ शकता किंवा जेवणासाठी छानशा रेस्टराँमध्ये घेऊन जाऊ शकता.
- बाहेर फिरायला जा: तुम्ही व्हॅलेंटाईन डेच्या निमित्तानं जवळच्या ठिकाणी प्रवास करु शकता. जर तुमच्याबरोबर तुमचे मित्र येत असतील तर तुम्ही तुमच्या मित्रांबरोबर पिकनिकला जाण्याचा प्लॅन करा. जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही दोन-तीन दिवसांची पिकनिक देखील प्लॅन करु शकता.
- चित्रपट बघा : तुम्हाला जर कुठे बाहेर जायचं नसेल तर तुम्ही तुमच्या बघायच्या राहून गेलेल्या मुव्ही बघू शकता. याने तुमचा चांगला वेळही जाईल आणि चांगले मुव्ही सुद्धा बघून मिळतील.
- स्वतःला डेटवर घेऊन जा: छान कपडे परिधान करा, एका छान फॅन्सी रेस्तराँमध्ये जा आणि तुमच्या आवडीचे जेवण घ्या. आपल्या आवडीचा एखादा चित्रपट बघून दिवस साजरा करा.
- शॉपिंग करा : माइंड डायव्हर्ट करण्यासाठी शॉपिंगपेक्षा चांगला दुसरा पर्याय नाही. आजच्या दिवशी मॉल्समध्ये कपल्सची गर्दी असते. पण मग तुम्ही लोकल मार्केटमध्ये फेरफटका मारू शकता. कदाचित तुम्हाला चांगल्या वस्तू खरेदी करायला मिळतील.