लखनौ - उन्नाव जिल्ह्यात घटसर्पाची (डिप्थीरिया) साथ पसरली आहे. या साथीत 8 बालकांचा मृत्यू झाला. तर 56 मुलांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काही मुलांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यावर त्यांना घरी पाठवण्यात आलं.
उत्तर प्रदेशमध्ये संसर्गजन्य रोगामुळे ८ बालकांचा मृत्यू, 'हे' आहेत लक्षणांसह उपचार - Unnao Diphtheria Outbreak - UNNAO DIPHTHERIA OUTBREAK
उन्नावमध्ये घटसर्पामुळे अनेक मुलांचे मृत्यू झाले आहेत.आरोग्य विभागाकडून दुर्लक्ष झाल्याचा नागरिकांनी आरोप केला. लसीकरणाला उशीर झाल्यामुळे मुले आजारी पडत असल्याचा पालकांनी दावा केला. जाणून घ्या, घटसर्पाची लक्षणे आणि उपचार!
Published : Sep 1, 2024, 11:17 AM IST
घटसर्प रोखण्यासाठी पाच वर्षांवरील बालकांना डीपीटी लसीकरण करणं आवश्यक असते. मात्र, योग्य प्रमाणात लसीकरण न झाल्यानं बालकांचे प्राण धोक्यात आले आहेत. 5 वर्षांपर्यंतच्या मुलांचे वेळेवर लसीकरण होत नसल्याचा पालकांकडून आरोप होत आहे. निष्काळजीपणामुळे बहुतांश मुलांची प्रकृती खालावल्याचा दावा पालकांनी केला. असोहा येथील सहारावन ग्रामपंचायतीच्या मजरा नवाज खेडा, दरिया खेडा सहारावा आदी भागात 20 दिवसांपासून सातत्यानं मृत्यू होत आहेत. आजारी किंवा मृत्यूमुखी पडलेल्या 70 टक्के बालकांना डीपीटी लस देण्यात आली नव्हती. मुख्यमंत्री कार्यालयाकडून सहारावनच्या एएनएमला निलंबित करण्यात आलं.
- लसीकरण अधिकारी संचालक डॉ. नरेंद्र सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदा एक वर्षासाठी लसीकरण करण्यात आलेल्या बालकांची संख्या अधिक होती. दर महिन्याला केवळ आठ टक्के मुलांना लसीकरण केले जाते. जुलै महिन्यापर्यंत सर्व ब्लॉकमध्ये सरासरी 32% लसीकरण करणे आवश्यक होते. मात्र, हे लसीकरण उद्दिष्टांहून खूप कमी झाले
घटसर्प आजारानं त्रस्त ५७ बालकांना जिल्हा रुग्णालयातील ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. तर 7 जणांना इतर रुग्णालयात पाठवण्यात आले. याच वॉर्डात दाखल झालेल्या मुलाच्या कुटुंबीयांनी सांगितलं की, त्यांच्या मुलाला डीपीटीची लसीकरण करण्यात आलेले नाही. संसर्ग वाढल्यानंतर काही मुलांना लसीकरण करण्यात आलं. उन्नाव जिल्हा रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉ. रियाझ अली मिर्झा म्हणाले की, " घटसर्पाची लागण झालेले 13 मुले रुग्णालयात दाखल आहेत. आतापर्यंत 7 रुग्णांना रेफर करण्यात आले आहे. तर रुग्णालयात आलेल्या इतर मुलांची प्रकृती सुधारल्यानंतर त्यांना घरी पाठवण्यात आलं आहे."
- घटसर्प म्हणजे काय: घटसर्प (डिप्थीरिया) हा संसर्गजन्य रोग आहे. कोरीनेबॅक्टेरियम डिप्थीरिया नावाच्या बॅक्टेरियामुळे या रोगाचा संसर्ग आणि प्रसार होतो. त्यामुळे टॉन्सिल्स, घसा, नाक आणि त्वचेवर परिणाम होतो. 5 वर्षाखालील मुलांना घटसर्पचा सर्वाधिक धोका असतो. तर काही प्रकरणांमध्ये 60 वर्षांवरील लोकांचादेखील मृत्यू होतो.
- काय आहेत घटसर्पवर उपचार: घटसर्पवर अँटीटॉक्सिनसह इतर औषधे दिली जातात. रोगाचा संसर्ग होत असल्यानं रुग्णाला काही दिवस कुटुंबापासून वेगळे ठेवण्याचा सल्ला दिला जातो. जर हा रोग गंभीर झाला तर रुग्णाला सहा आठवड्यांपेक्षा जास्त काळ विश्रांती घ्यावी लागते.
- हा रोग कसा पसरतो: जेव्हा रुग्ण खोकतात किंवा शिंकतात तेव्हा हा रोग पसरू शकतो. लसीकरण न केलेल्या मुलांना याची लवकर लागण होण्याचा धोका असतो.
- ही आहेत रोगाची लक्षणे : घशात जडपणा आणि वेदना जाणवणे. अन्न किंवा इतर कोणतीही वस्तू गिळण्यास त्रास होतो. तापासह अशक्तपणा जाणवू लागतो.