हैदराबाद Lok Sabha Election 2024 : तेलंगाणाच्या राज्यपाल तमिलिसाई सुंदरराजन यांनी राज्यपाल पदाचा राजीनामा दिला आहे. तामिळनाडूमधून लोकसभा निवडणूक 2024 लढवण्यासाठी त्यांनी राजीनामा दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
तामिळनाडूतून लोकसभा लढण्याची शक्यता :तेलंगणाच्या राज्यपाल तमिलिसाई सुंदरराजन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. तमिलिसाई सुंदरराजन या तामिळनाडूतून लोकसभा निवडणूक 2024 लढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तमिलिसाई सुंदरराजन या तामिळनाडूमधील ज्येष्ठ नेत्या आहेत. त्यांच्याकडं तेलंगाणा आणि पुद्दुचेरी इथलाही राज्यपाल पदाचा पदभार आहे.
तामिळनाडूच्या भाजपा प्रमुख होत्या तमिलिसाई सुंदरराजन :तामिळनाडू भाजपाच्या तमिलिसाई सुंदरराजन या ज्येष्ठ नेत्या आहेत. त्यांनी तामिळनाडू भाजपा प्रमुख म्हणून 2019 पर्यंत काम केलं आहे. त्यांच्या नेतृत्वात भाजपानं तामिळनाडूत मोठं यश मिळवलं आहे. भाजपा प्रमुख असताना त्यांची 2019 मध्ये तेलंगाणाच्या राज्यपाल म्हणून नियुक्ती केली आहे. तेव्हापासून त्या तेलंगाणा इथं राज्यपाल म्हणून कार्यरत होत्या. त्यांच्याकडं पुद्दुचेरीचाही प्रभार होता. त्यामुळे एकाच वेळी तमिलिसाई सुंदरराजन यांनी तेलंगाणा राज्यपाल आणि पुद्दुचेरीच्या उपराज्यपाल म्हणून त्यांनी कार्यभार संभाळला आहे.
लोकसभा निवडणुकीत झाला होता पराभव :तमिलिसाई सुंदरराजन यांनी लोकसभा निवडणूक 2019 मध्ये डीएमकेच्या नेत्या कनिमोझी यांच्या विरोधात भाजपाकडून निवडणूक लढवली होती. मात्र तमिलिसाई सुंदरराजन यांना कनिमोझी यांनी हरवलं होतं. त्यानंतर प्रभावी नेत्या असलेल्या तमिलिसाई सुंदरराजन यांना तेलंगाणाच्या राज्यपाल म्हणून पक्षानं जबाबदारी सोपवली होती. आता पुन्हा तमिलिसाई सुंदरराजन या त्यांच्या थूथुकुडी मतदार संघातून लोकसभा निवडणूक 2024 लढवणार आहेत, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हेही वाचा :
- Republic Day : प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याकडे मुख्यमंत्री के सी राव यांनी फिरवली पाठ, राज्यपालांनी राजभवनात फडकावला राष्ट्रध्वज
- Fish Vegitarian Dish : काय म्हणता! माशांचा समावेश शाकाहारी भोजनात करा, तेलंगणाच्या राज्यपालांची मागणी
- Respect for Musicians : राज्यपालां हस्ते संगीतकार एमएम किरावानी आणि चंद्रबोस सन्मानित