महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

रामकृष्ण मिशनचे अध्यक्ष स्वामी स्मरणानंद महाराजांचं 95 व्या वर्षी निधन; पंतप्रधानांसह उपमुख्यमंत्री फडणवीसांकडून शोक व्यक्त - Swami Smaranananda Maharaj - SWAMI SMARANANANDA MAHARAJ

Swami Smaranananda Maharaj : रामकृष्ण मठ आणि रामकृष्ण मिशनचे स्वामी स्मरणानंद महाराज यांचं मंगळवारी दीर्घ आजारानं निधन झालं. ते वयाशी संबंधित आजारानं त्रस्त होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केलाय.

रामकृष्ण मिशनचे अध्यक्ष स्वामी स्मरणानंद महाराजांचं 95 व्या वर्षी निधन; पंतप्रधान मोदी, उपमुख्यमंत्री फडणवींसांकडून शोक व्यक्त
रामकृष्ण मिशनचे अध्यक्ष स्वामी स्मरणानंद महाराजांचं 95 व्या वर्षी निधन; पंतप्रधान मोदी, उपमुख्यमंत्री फडणवींसांकडून शोक व्यक्त

By ANI

Published : Mar 27, 2024, 8:53 AM IST

कोलकाता Swami Smaranananda Maharaj : रामकृष्ण मठ आणि रामकृष्ण मिशन बेलूर मठाचे अध्यक्ष स्वामी स्मरणानंद महाराज यांचं मंगळवारी दीर्घ आजारानं रामकृष्ण मिशन सेवा प्रतिष्ठान इथं निधन झालं. 95 वर्षीय स्वामी स्मरणानंद महाराजांवर 1 मार्च 2024 पासून उपचार सुरू होते.

गेल्या काही दिवसांपासून होते आजारी : रामकृष्ण मठ आणि मिशनचे माजी अध्यक्ष स्वामी आत्मस्थानंद महाराज यांच्या निधनानंतर स्वामी स्मरणानंद महाराज यांनी रामकृष्ण मठ आणि मिशनचे 16 वे अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला होता. त्यांनी 17 जुलै 2017 रोजी रामकृष्ण मठाचे अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला होता. गेल्या सहा महिन्यांपासून ते वृद्धापकाळाशी संबंधित आजारानं त्रस्त होते. सुमारे महिनाभर ते कोलकाता येथील रामकृष्ण मिशन सेवा प्रतिष्ठान रुग्णालयात दाखल होते. न्यूरोलॉजी आणि इतर विभागातील डॉक्टरांनी त्यांना नियमित निरीक्षणाखाली ठेवले. उत्तम वैद्यकीय सेवा असूनही गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती.

पंतप्रधान मोदी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याकडून शोक व्यक्त : पंतप्रधान नरेंद्र मोदी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि पश्चिम बंगालचे राज्यपाल सीव्ही आनंद बोस यांनी या महिन्याच्या सुरुवातीला महाराजांची भेट घेतली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वामी स्मरणानंद महाराज यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केलाय.

काय म्हणाले पंतप्रधान मोदी : स्वामी स्मरणानंद महाराज यांच्या निधनावर पंतप्रधान मोदींनी सोशल मीडियावर एक पोस्ट केलीय. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलंय, "रामकृष्ण मठ आणि रामकृष्ण मिशनचे अध्यक्ष श्रीमत् स्वामी स्मरणानंदजी महाराज यांनी आपलं जीवन अध्यात्म आणि सेवेसाठी समर्पित केलं. त्यांनी असंख्य लोकांच्या हृदयांवर आणि मनांवर आपली छाप सोडली. त्यांची करुणा आणि ज्ञान पुढील पिढ्यांना प्रेरणा देत राहील."

हेही वाचा :

  1. शांतिगिरी महाराज नाशिक लोकसभा मतदारसंघातून लढण्यास इच्छुक; राज ठाकरेंकडं चर्चेसाठी मांडला प्रस्ताव
  2. लोकसभा निवडणुकीकरिता आध्यात्मिक नगरी नाशिकमधून तीन धर्मगुरू इच्छुक, कोणत्या पक्षांकडून मिळणार उमेदवारी?

ABOUT THE AUTHOR

...view details