महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

तिरुपती : तिकीट काउंटरवर चेंगराचेंगरी, किमान चार जणांचा मृत्यू, मृतांची संख्या वाढण्याची भीती - STAMPEDE IN TIRUMALA IN AP

तिरुपतीमधील टोकन जारी करणाऱ्या काउंटरवर मोठ्या संख्येनं भाविकांनी रांगेत जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी चेंगराचेंगरीत किमान ४ भाविकांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

तिरुपती मंदिर
तिरुपती मंदिर (ETV Bharat Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 8, 2025, 10:44 PM IST

तिरुपती :तिरुपतीमधील सर्वदर्शन टोकन वाटप केंद्रांवर तीन ठिकाणी भाविकांमध्ये हाणामारी झाली. त्यानंतर श्रीनिवासम काउंटरवर रांगेत झालेल्या चेंगराचेंगरीत तामिळनाडूतील सेलम येथील एका महिला भाविकाचा मृत्यू झाला. टोकन वाटप केंद्रावर रांगेत प्रवेश करत असताना भाविकांनी एकमेकांना धक्काबुक्की केल्याने चेंगराचेंगरी झाली.

बैरागीपट्टेडा रामनायडू शाळेतील टोकन जारी केंद्रात झालेल्या चेंगराचेंगरीत आणखी चार जण जखमी झालेत. त्यांना तिरुपती येथील रुईया रुग्णालयात नेण्यात आलं. तिघांचा तेथे उपचार सुरू असताना मृत्यू झाला. चेंगराचेंगरीत एकूण चार जणांचा मृत्यू झाला. तसंच, सत्यनारायणपूरम येथील टोकन जारी केंद्रावर आणखी एका ठिकाणी चेंगराचेंगरी झाली.

तिरुपती मंदिर (ETV Bharat Reporter)

या महिन्याच्या 10, 11 आणि 12 तारखेला वैकुंठद्वार सर्वदर्शन टोकन दिले जात आहेत. तिरुमला तिरुपती देवस्थानम (TTD) ने घोषणा केली आहे की गुरुवारी पहाटे 5 वाजल्यापासून टोकन जारी केले जातील. त्यासाठी बुधवारी सायंकाळपासूनच भाविकांनी टोकन वाटप केंद्रांवर रांगा लावल्या होत्या.

कर्मचाऱ्यांनी भाविकांना वैकुंठद्वार सर्व दर्शन टोकनसाठी रस्त्यावर जमण्याऐवजी उद्यानात थांबायला लावले. पद्मावती पार्कपासून भाविकांना रांगेत उभे करण्यात आले. भाविकांना रांगेत उभे केले जात असताना अचानक हाणामारी झाली. टोकन वाटप केंद्रांवर सुरक्षा व्यवस्था नसल्याने हाणामारीवर लगेच नियंत्रण मिळवता आलं नाही. व्यवस्था योग्य प्रकारे करण्यात आली नसल्याबद्दल भाविक संताप व्यक्त करत आहेत. वाट पाहणाऱ्या भाविकांसाठी विष्णू निवास आणि भूदेवी कॉम्प्लेक्स येथे शेड उभारण्यात आलं होतं.

तिरुमला तिरुपती देवस्थाननं या महिन्याच्या 10, 11 आणि 12 तारखेला वैकुंठ द्वार सर्व दर्शन टोकन जारी करण्याची व्यवस्था केली आहे. TTD अधिकारी 3 दिवसात 40,000 प्रतिदिन दराने 1.2 लाख टोकन जारी करतील. त्यामुळे वैकुंठद्वार सर्व दर्शन टोकनसाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. TTD ने गुरुवारी पहाटे 5 वाजता दर्शन तिकिटे जारी केली जातील अशी घोषणा केल्यानंतर, तामिळनाडू, कर्नाटक आणि तेलुगू भाषिक राज्यातील भाविक तसंच तिरुपतीचे स्थानिक लोक मोठ्या संख्येनं टोकन जारी करणाऱ्या केंद्रांवर पोहोचले. टोकन वाटप केंद्रांवर संध्याकाळपासून भाविक ताटकळत थांबले होते.

TTD ने आधीच घोषणा केली आहे की तीन दिवसांसाठी 1.20 लाख टोकन जारी केले जातील. श्रीनिवासम, विष्णू निवासम, रामचंद्र पुष्करणी, अलीपिरी भूदेवी कॉम्प्लेक्स, एमार पल्ली झेडपी हायस्कूल, बैरागीपट्टेडा रामनायडू हायस्कूल, सत्यनारायण पुरम झेडपी हायस्कूल आणि इंदिरा मैदान केंद्रांवर तिकिटे दिली जातील.

हेही वाचा..

  1. तिरुमला तिरुपती देवस्थानाकडून अंबाबाईला मानाचा शालू अर्पण, शालूची किंमत किती? जाणून घ्या - Tirupati Shalu for Ambabai

ABOUT THE AUTHOR

...view details