हैदराबाद Sonakshi Sinha Wedding news:अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाच्या लग्नाची चर्चा सोशल मिडियावर चांगलीच रंगली आहे. झहीर इक्बाल यांचा धर्म वेगळा असल्यामुळे लग्नावारून परिवारात वाद निर्माण झाल्याची चर्चा होती. सोनाक्षीला कुटुंबियांकडून लग्नासाठी होकार मिळायला वेळ लागला. अशातच सोनाक्षी लग्नानंतर इस्लाम धर्म स्वीकारणार का या चर्चांनी जोर धरला आहे. तिचे भावी सासरे इक्बाल रतनसी यांनी उत्तरं दिलं.
चर्चेमध्ये काहीही तथ्य नाही:अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा ही धर्म बदलणार या चर्चेमध्ये काहीही तथ्य नसल्याचं तिच्या भावी सासऱ्यांनी सांगितलं आहे. सोनाक्षी इस्लाम धर्म स्वीकारणार नाही. दोघांचा विवाह 'विशेष विवाह कायदा १९५१' नुसार होईल. लग्नात हिंदू किंवा मुस्लिम रितीरिवाज नसतील. सोनाक्षी तिचा धर्म बदलणार नाही, हे निश्चित आहे, असेही त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं आहे.
लग्नाच्या दोन दिवसापूर्वी सोनाक्षीचे वडील अभिनेता शत्रुघ्न सिन्हा यांनी त्याच्या भावी जावई झहीरची भेट घेतली. अभिनेता शत्रुघ्न सिन्हा या लग्नावर खूश नसून ते लग्नाला येणार नसल्याच्या बातम्या आल्या होत्या. यावर अभिनेता शत्रुघ्न यांना विचारलं असता त्यांनी बातम्यांबाबत काहीही माहिती नसल्याचं सांगितलं. या सर्व अफवांना पूर्णविराम देत जावई झहीर इक्बालला मिठी मारली. त्याला आर्शीवाद दिलं.
रिसेप्शन पार्टी: सोनाक्षी आणि झहीर 23 जून रोजी कोर्ट मॅरेज करणार आहेत. त्यानंतर मुंबईतील शिल्पा शेट्टीच्या हाय-प्रोफाइल रेस्टॉरंट बास्टनमध्ये रिसेप्शन पार्टी आयोजित केली आहे. सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल 7 वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहे. आज संध्याकाळी लग्नाच्या बंधनात बंधणार आहेत. हुमा कुरेशी आणि आयुष शर्मा यांच्यासह अनेक सेलिब्रिटी या खास दिवशी उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
सोनाक्षीचे हे चित्रपट होणार प्रदर्शित-सोनाक्षी अलीकडेच संजय लीला भन्साळी यांच्या 'हिरामंडी: द डायमंड बाजार' या पहिल्या मालिकेत दिसली होती. मनीषा कोईराला, संजीदा शेख, आदिती राव हैदरी आणि शर्मीन सहगल मेहता यांच्याही प्रमुख भूमिका होत्या. सोनाक्षी लवकरच 'काकुडा' चित्रपटात दिसणार आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाचा तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. चित्रपटाचे दिग्दर्शक आदित्य सरपोतदार आहेत. 2022 मध्ये रिलीज झालेल्या 'झोम्बिवली' आणि 7 जून रोजी रिलीज झालेल्या 'मुंज्या' नंतर हॉरर कॉमेडी प्रकारातील हा तिसरा चित्रपट आहे. याशिवाय सोनाक्षी लवकरच 'निकिता रॉय अँड बुक ऑफ डार्कनेस' या थ्रिलर चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाद्वारे त्याचा भाऊ कुश सिन्हा दिग्दर्शन क्षेत्रात प्रवेश करत आहे. परेश रावल आणि सुरेश नय्यरहे देखील या चित्रपटाचा असणार आहेत.
हेही वाचा
- सोनाक्षी सिन्हा-झहीर इक्बालच्या मेहंदी सोहळ्याचे सुंदर फोटो आले समोर - Sonakshi Sinha Wedding
- सोनाक्षी सिन्हाच्या लग्नाआधी थरारक 'काकुडा'ची रिलीज तारीख जाहीर - Kakuda Release Date