महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

NCERTच्या नव्या पुस्तकांतून बाबरी मशीद, गुजरात दंगल, हिंदुत्वाचे संदर्भ वगळले - NCERT books Changes - NCERT BOOKS CHANGES

NCERT books Changes : नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंगनं (NCERT) इयत्ता 12वीच्या राज्यशास्त्राच्या पाठ्यपुस्तकात अनेक बदल केले आहेत. बाबरी मशीद, रथयात्रा, कारसेवा विध्वंसानंतरच्या हिंसाचाराची माहिती एनसीईआरटीच्या नव्या पुस्तकातून काढून टाकण्यात आली आहे. बाबरी मशीद या नावाऐवजी पुस्तकात फक्त तीन घुमट वास्तू म्हणून बदल करण्यात आला आहे.

NCERT
एनसीईआरटी (ETV BHARAT National Desk)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 16, 2024, 9:34 PM IST

हैदराबादNCERT books Changes :नॅशनल कौन्सिल फॉर एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग (NCERT) च्या १२वीच्या नवीन राज्यशास्त्राच्या पुस्तकातून बाबरी मशीद तसंच गुजरात दंगलीशी संबंधित संदर्भ काढून टाकण्यात आले आहेत. एनसीईआरटीचे संचालक दिनेश प्रसाद सकलानी यांचंही वक्तव्य यासंदर्भात समोर आलं आहे.

एका मीडिया रिपोर्टनुसार, 'गेल्या आठवड्यात प्रसिद्ध झालेल्या NCERT इयत्ता 12वीच्या पॉलिटिकल सायन्सच्या पुस्तकात बाबरी मशिदीचं नाव काढून टाकण्यात आलं आहे. बाबरी मशिदी ऐवजी 'तीन घुमट रचना' असा संदर्भ देण्यात आला आहे. सुधारित पाठ्यपुस्तकात अयोध्या प्रकरण दोन पानांपुरतं मर्यादित ठेवण्यात आलं आहे. तसंच मशीद पाडण्याचे अनेक संदर्भ काढून टाकण्यात आले आहेत.

महत्त्वाचे तपशील वगळले : अयोध्या प्रकरणातील काही महत्त्वाचे तपशील वगळण्यात आले आहेत. ज्यात लालकृष्ण अडवाणींच्या नेतृत्वाखालील भाजपाची रामजन्मभूमी आंदोलनासाठी समर्थकांना एकत्रित करण्यासाठी रथयात्रा, बाबरी मशीद पाडण्यात कारसेवकांची महत्त्वाची भूमिका, मशिदीनंतर झालेल्या जातीय दंगलींचा समावेश होता. त्याऐवजी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत करण्यात आलंय. मंदिरातील राम मूर्तीचा अभिषेक यावर्षी 22 जानेवारीला पंतप्रधानांनी केला होता. गुजरात दंगलीबाबतही पुस्तकातून अनेक गोष्टी काढून टाकल्या आहेत.

'आम्ही दंगलींबद्दल का शिकवावं': गुजरात दंगल तसंच बाबरी मशीदबाबत विद्यार्थ्यांना का शिकवायला हवं. आम्हाला देशात सकारात्मक विद्यार्थी, नागरिक घडवायचे आहेत, असं एनसीईआरटीचे संचालक दिनेश प्रसाद सकलानी यांनी म्हटलं आहे. 'आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना अशा प्रकारे शिकवलं पाहिजे का? ज्यामुळं विद्यार्थी आक्रमक होतील, समाजात द्वेष निर्माण करतील. हाच शिक्षणाचा उद्देश आहे का? अशा लहान मुलांना दंगलीबद्दल का शिकवायचं. ते मोठे झाल्यावर त्यांना याबाबत माहिती मिळू शकते, पण शालेय पाठ्यपुस्तकांमधून त्यांना अशी माहिती का द्यावी, असा प्रतिप्रश्न त्यांनी केला.

हे वाचलंत का :

  1. आदित्य ठाकरेंची 'एनडीए' सरकारबाबत मोठी भविष्यवाणी; निवडणूक आयोगावरही हल्लाबोल - Aaditya Thackeray On NDA
  2. खवय्यांसाठी पुण्यात चक्क 'लेडी बाऊन्सर' तैनात; काय आहे नेमकी भानगड? - Society Bouncers Pune
  3. 'गुगल मॅप'मुळं पन्नास विद्यार्थी यूपीएससी परीक्षेपासून वंचित, वाचा काय आहे प्रकरण? - UPSC Exam

ABOUT THE AUTHOR

...view details