पुरीPuri Shreemandir Ratna Bhandar Reopens :ओडिशातील जगन्नाथ मंदिराचा खजिना आज (14 जुलै) दुपारी 1:28 वाजता उघडण्यात आला. ओडिशाच्या मुख्यमंत्री कार्यालयानं याला दुजोरा दिला आहे. तत्पूर्वी, तिजोरीतील मौल्यवान वस्तूंच्या यादीवर लक्ष ठेवण्यासाठी राज्य सरकारनं स्थापन केलेल्या समितीचे अध्यक्ष न्यायमूर्ती विश्वनाथ रथ यांनी सांगितलं की, पुरी येथे झालेल्या समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. श्री जगन्नाथ मंदिर प्रशासन (SJTA) मुख्य प्रशासक अरबिंदा पाधी यांच्यासह समितीचे सदस्य उपस्थित होते.
पुरीतील भगवान जगन्नाथ मंदिराचं रत्न भांडार 46 वर्षांनंतर पुन्हा उघडलं - Jagannath temple - JAGANNATH TEMPLE
Puri Shreemandir Ratna Bhandar Reopens : ओडिशाच्या पुरी येथे असलेल्या जगन्नाथ मंदिरातील रत्न भांडार आज 46 वर्षांनंतर उघडण्यात आलं. त्यात मिळालेल्या मौल्यवान रत्नं, सोन्या-चांदीच्या दागिन्यांची डिजिटल यादी केली करण्यात येणार आहे.
Published : Jul 14, 2024, 7:40 PM IST
46 वर्षांपूर्वी उघडलं होतं रत्न भंडार : अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, सरकार रत्न भंडारमध्ये असलेल्या मौल्यवान वस्तूंची डिजिटल यादी करेल, ज्यामध्ये त्यांचे वजन, तपशील असतील. मंदिराचा शेवटचा खजिना अधिकृतपणे 46 वर्षांपूर्वी 1978 मध्ये उघडण्यात आला होता. तिजोरी उघडण्यापूर्वी प्रशासनानं सहा जड लाकडी संदूक मागवले होते. एक संदूक उचलायला आठ ते दहा जण लागले होते. दुसरीकडं, रत्न भंडारचा दुसरा दरवाजा उघडताच एसपी पिनाक मिश्रा बेहोश झाले, मात्र यामागचं कारण समजू शकलं नाही. डॉक्टरांच्या पथकानं त्याच्यावर मंदिराच्या आवारातच उपचार केले. त्याच वेळी, 5.15 वाजता ओडिशा आपत्ती जलद कृती दल जगन्नाथ मंदिरातून बाहेर पडलं.
रत्न भंडरात साप असल्याची अफवा :पूर्वी रत्न भंडरात साप असल्याची अफवा पसरली होती. रत्न भंडार उघडल्यानंतर, मीडिया रिपोर्ट्समध्ये असं म्हटलं आहे की, समितीचे सदस्य परत आले, तेव्हा त्यांनी खजिन्यात साप नसल्याचं सांगितलं. त्याचवेळी मंदिरातील एका सेवकाच्या म्हणण्यानुसार रत्ना भंडारच्या दागिन्यांमध्ये पाणी आढळून आलंय. जगन्नाथ मंदिर प्रशासन (एसजेटीए) प्रमुख अरबिंदा पाधी यांनी सांगितलं की, कुलूप तोडून आतील भंडार उघडण्यात आलं.