महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

लोकसभा अधिवेशन 2024: राहुल गांधींचं हिंदुत्वावर वादग्रस्त वक्तव्य; आज पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार पलटवार - Lok Sabha Session 2024 - LOK SABHA SESSION 2024

Lok Sabha Session 2024 : विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी हिंदुत्वावरुन कथित वादग्रस्त वक्तव्य केल्यानं भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी लोकसभा अधिवेशनात मोठा गदारोळ केला. या प्रकरणी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेत पलटवार करणार आहेत. थोड्याच वेळात लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करणार आहेत.

Lok Sabha Session 2024
संपादित छायाचित्र (ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 2, 2024, 11:26 AM IST

Updated : Jul 2, 2024, 2:34 PM IST

नवी दिल्ली Lok Sabha Session 2024 : काँग्रेस खासदार आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लोकसभेत बोलताना हिंदुत्वावरुन वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. राहुल गांधी यांच्या या वादग्रस्त वक्तव्याचे आज देशभरात पडसाद उमटत आहेत. राहुल गांधी यांच्या वक्तव्याला आज पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेत पलटवार करणार आहेत. त्यामुळे आज संसदेच्या अदिवेशनात मोठा गदारोळ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

काय म्हणाले होते राहुल गांधी :लोकसभेच्या अधिवेशनात बोलताना विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी हिंदुत्वावरुन वादग्रस्त वक्तव्य केलं. या वादग्रस्त वक्तव्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आक्षेप घेतल्यानंतर सारवासारव करताना राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजेच सगळे हिंदू नाहीत. भाजपा म्हणजेच सगळे हिंदुत्व नाही, आरएसएस म्हणजे सगळे हिंदू नाहीत, असं स्पष्ट केलं. मात्र राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यामुळे भाजपातील वरिष्ठ नेत्यांनी मोठी टीका सुरू केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार पलटवार : विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी हिंदुत्वाच्या मुद्यावर वादग्रस्त वक्तव्य केल्यानं सभागृहात मोठा गदारोळ करण्यात आला. सत्ताधाऱ्यांनी राहुल गांधी यांच्यावर मोठी टीका केली. मात्र राहुल गांधी यांनी आपण भाजपाच्या हिदुत्वावर टीका केल्याची सारवासारव केली. सभागृहातील वातावरण तापल्यानं लोकसभा काहीकाळ तहकूब करण्यात आली. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी राहुल गांधी यांच्या टीकेला प्रत्युत्तर देण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दुपारी 4 वाजता राहुल गांधी यांच्या टीकेला उत्तर देण्याची शक्यता आहे. त्यामुळे पंंतप्रधान नरेंद्र मोदी हे राहुल गांधी यांच्या टीकेला कसं प्रतिउत्तर देणार, याकडं नागरिकांचं लक्ष लागलं आहे.

हेही वाचा :

  1. हिंदू धर्म हा भीती, द्वेष पसरवत नाही, मात्र भाजपावाले तेच करतात: राहुल गांधी यांचा लोकसभेत घणाघात - Rahul Gandhi in Lok Sabha
  2. राहुल गांधींनी भाजपाच्या नकली हिंदुत्वाचा मुखवटा उतरविला-संजय राऊत - Sanjay Raut news
  3. विधानपरिषदेत अंबादास दानवे आणि प्रसाद लाड यांच्यात खडाजंगी - Ambadas Danve On Prasad Lad
Last Updated : Jul 2, 2024, 2:34 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details