हसन (कर्नाटक) Suraj Revanna Sexual Assault Case : कर्नाटकमधील सेक्स स्कँडलमध्ये सहभागी असलेल्या प्रज्वल रेवन्नाचा भाऊ सूरज रेवन्ना याला हसन पोलिसांनी अटक केलीय. सूरजवर एका जेडीएस कार्यकर्त्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर आरोप आहे. या प्रकरणी शनिवारी (22 जून) सूरज रेवन्नावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर त्याला रात्री उशिरा अटक करण्यात आली.
काय आहे प्रकरण? :जेडीएसच्या एका कार्यकर्त्यानं पोलिसांत तक्रार दाखल केली होती की, होलेनरासीपुराचे आमदार एच.डी. रेवन्ना यांचा मोठा मुलगा सूरज रेवन्ना (वय 37) यानं 16 जून रोजी सायंकाळी होलेनरासीपुरा तालुक्यातील घनिकाडा येथील त्यांच्या फार्महाऊसवर त्याच्यावर लैंगिक अत्याचार केला. मात्र, सूरज रेवन्नानं हे सर्व आरोप फेटाळून लावले. त्यानं सांगितलं की, एका व्यक्तीनं त्याच्याकडून 5 कोटी रुपये उकळण्यासाठी खोटी तक्रार दाखल केली. तसंच या संदर्भात सुरज रेवन्ना यांचा जवळचा सहकारी शिवकुमार याच्या तक्रारीवरून पोलिसांनी एकाविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल केला.